UK : 'या' महिलेने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:03 AM2021-10-11T11:03:51+5:302021-10-11T11:10:48+5:30

आपल्या निर्णयाचा बचाव करत महिलेने तर्क दिला की, ती तिच्या बॉयफ्रेन्डच्या वडिलांना दु:खी बघू शकत नव्हती. ती त्यांना खूश ठेवण्यासाठी काहीही करू शकत होती.

Britain : Woman marries boyfriends father reason is also quite shocking | UK : 'या' महिलेने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, कारण वाचून चक्रावून जाल

UK : 'या' महिलेने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, कारण वाचून चक्रावून जाल

Next

ब्रिटनमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेबाबत वाचल्यावर लोक हैराण झाले आहेत. इंग्लिश ग्लूस्टरशायरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने बॉयफ्रेन्डच्या वडिलासोबतच लग्न केलं. कारण बॉयफ्रेन्ड तिच्या आईला घेऊन पळाला होता. आपल्या निर्णयाचा बचाव करत महिलेने तर्क दिला की, ती तिच्या बॉयफ्रेन्डच्या वडिलांना दु:खी बघू शकत नव्हती. ती त्यांना खूश ठेवण्यासाठी काहीही करू शकत होती.

टिकटॉक यूजर @ys.amri म्हणाली की, माझ्या बॉयफ्रेन्डच्या आईचा मृत्यू झाला होता. मला वाटत होतं की, त्याचे वडील दु:खी होऊ नये. त्यामुळे मी त्यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला. अशात माझ्या बॉयफ्रेन्डला पुन्हा आई मिळाली. पण नंतर समजलं की, २४ वर्षीय जेस एल्ड्रिजचा बॉयफ्रेन्ड रयान शेल्टन तिच्यासोबत पळून गेला होता.

या घटनेनंतर जेसने रयानच्या वडिलांसबोत ग्लूस्टरशायरमध्ये लग्न केलं. रयान शेल्टन हा कोरोना महामारीमुळे आपल्या गर्लफ्रेन्डची आई जॉर्जीना आणि तिचे वडील एरिकसोबत ग्लूस्टरशायरमध्ये बऱ्याच दिवसांपासून राहत होता. जेसला आधीच तिची आई आणि बॉयफ्रेन्डच्या अफेअरची शंका होती. नंतर ही शंका खरी ठरली.

प्रेग्नेंट जेस जेव्हा हॉस्पिटलमधून बॉयफ्रेन्डच्या बाळाला जन्म देऊन घरी परतली तेव्हा तिची आई रयानसोबत फरार झाली होती. याचा तिला चांगलाच धक्का बसला. जेस म्हणाली की, 'मला याच अजूनही वाईट वाटतंय की, ते दोघे असं कसं करू शकतात. मला इथे दोन लेकरांना सांभाळण्यासाठी एकटीला सोडून गेले.  मला विश्वास बसत नाहीये की, आईने अजूनही सॉरी म्हणण्याची हिंमत दाखवली नाही'.
 

Web Title: Britain : Woman marries boyfriends father reason is also quite shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.