Britain's Spielplatz Nudist Village : ...म्हणून 'या' गावात पुरूषांसह स्त्रीयासुद्धा कायम नग्नावस्थेत राहतात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 07:08 PM2021-04-08T19:08:22+5:302021-04-08T19:18:45+5:30
Britain's Spielplatz Nudist Village : मूलभूत सुविधांची कमतरता नाही. परंतु जे लोक परंपरा आणि श्रद्धा पाळतात ते कपड्यांशिवाय राहतात.
जगात अशी अनेक ठिकाणं आहेत. जिथं वेगवेगळ्या प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. काही प्रथांवर लोकांचा विश्वास बसता बसत नाही. अशाच एका आगळ्या वेगळ्या परंपरेची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा गावाबद्दल सांगणार आहोत. जो प्रकार तुम्ही यापुर्वी कधीही ऐकलेला नसेल. या गावात सगळेचजण बिना कपड्याचे राहतात. त्यांच्याकडे घालायला कपडे नाहीत, अश्यातला भाग नाही पण इथं गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.
ब्रिटनचे सीक्रेट न्युडिस्ट व्हिलेज असे आहे जेथे लोक कित्येक वर्षांपासून कपड्यांशिवाय राहतात. मूलभूत सुविधांची कमतरता नाही. परंतु जे लोक परंपरा आणि श्रद्धा पाळतात ते कपड्यांशिवाय राहतात. मिरर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, हर्टफोर्डशायरमधील स्पीलप्लेट्झ गावात केवळ वृद्ध लोकच नाही तर लहान मुलं, स्त्रीयादेखील कपड्यांशिवाय राहतात.
सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..
हर्टफोर्डशायरमधील हे गाव ब्रिटनमधील सर्वात जुन्या वसाहतींपैकी एक आहे. येथे केवळ चांगली घरंच नाहीत, तर लोकांसाठी खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स, लक्जरीस स्विमिंग पूल, बार सारख्या सुविधा देखील आहेत. ९० वर्षांहून अधिक काळापासून लोक इथे असेच जगत आहेत. जगभरातील लोकांनी या गावात अनेक लघुपट बनवले आहेत. शेजारी, पोस्टमन आणि सुपरमार्केट वितरण करणारे लोक येथे वारंवार येतात. या गावाचे नाव स्पीलप्लेट्झ आहे, ज्याचा अर्थ खेळाचे मैदान आहे.
बाल्कनीमध्ये न्यूड पोज देऊन अडचणीत आल्या १२ महिला
दरम्यान दुबईतील एका पॉश परिसरात बाल्कनीमध्ये उभ्या या महिला एका प्रोफेशनल फोटोग्राफरला पोज देत होत्या. एका दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या बाल्कनीतून या महिलांचे फोटो काढून व्हायरल केले. सौदी अरबमधील वृत्तपत्र द नॅशनलच्या रिपोर्टनुसार, हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो. रिपोर्टनुसार, या महिलांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली जाऊ शकते आणि त्यांना एक हजार पाउंडचा दंडही भरावा लागू शकतो.
नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार
सौदी अरबमध्ये कायदे फारच कठोर आहेत आणि या देशात पब्लिकमध्ये किस करणे किंवा विना लायसन्स दारू पिणे यासाठी शिक्षा होते. सौदी अरबच्या अनेक भागात शरीया कायदा चालतो आणि या देशात पॉर्नवरही दंड भरावा लागू शकतो. किंवा तुरूंगावासाची शिक्षाही होऊ शकते.