ब्रिटिश बुलडॉगने केला स्केटिंगचा विश्वविक्रम
By admin | Published: November 13, 2015 01:19 PM2015-11-13T13:19:19+5:302015-11-13T13:19:19+5:30
माणसाकडून अनेक कला शिकणा-या एका कुत्र्याने आता स्केटिंगची कला नुसतीच शिकली नसून विश्वविक्रमही केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लिमा (पेरू), दि. १३ - माणसाकडून अनेक कला शिकणा-या एका कुत्र्याने आता स्केटिंगची कला नुसतीच शिकली नसून विश्वविक्रमही केला आहे. ओटो असं तीन वर्षाच्या या ब्रिटिश बुलडॉगचं नाव असून लुसियाना व्हिले आणि रॉबर्ट रिकार्ड्स अशी त्याच्या मालकाची नावं आहेत. तीस माणसांनी पाय फाकवून तयार केलेल्या मानवी बोगद्यातून ओटोनं लीलया स्केटिंग केलं असून त्याची करामत बघून भल्याभल्यांनीही तोंडात बोटं घातली आहेत.
त्या निमुळत्या बोगद्यातून अगदी माणसासारखं एका बाजुला झुकत, एका पायाने स्केटूोर्डला गती देत ओटोनं हूबेहूब माणसांसारखं स्केटिंग करत हा बोगदा पार केला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं त्याची दखल घेतली. गिनीजच्या अधिकारी साराह कसन यांनी तसं प्रमाणपत्र लुसियाना व रॉबर्टला दिलं आहे.