नशीब असावं तर असं! खर्च केले फक्त २,५०० रुपये अन् मिळाला २० कोटींचा बंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:13 PM2022-12-10T13:13:06+5:302022-12-10T13:14:21+5:30

झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी लोक काय काय करतात. कुणी शेअर बाजारात नशीब आजमावतो तर क्रिप्टोकरन्सीच्या जगात प्रवेश केला

british couple won luxurious house worth 20 crore in a lottery jackpot | नशीब असावं तर असं! खर्च केले फक्त २,५०० रुपये अन् मिळाला २० कोटींचा बंगला

नशीब असावं तर असं! खर्च केले फक्त २,५०० रुपये अन् मिळाला २० कोटींचा बंगला

googlenewsNext

झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी लोक काय काय करतात. कुणी शेअर बाजारात नशीब आजमावतो तर क्रिप्टोकरन्सीच्या जगात प्रवेश केला, कारण हे असे प्लॅटफॉर्म आहेत ज्यात एका झटक्यात अनेकांना कोट्याधीश बनवलं आहे. त्याचवेळी, काही लोक लॉटरीमध्ये नशीब आजमावून पाहतात. लॉटरी अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये बंपर बक्षीस जिंकणे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. काही लोकांचं नशीब एकदम जोरावर असतं आणि ते झटपट श्रीमंत होतात. सध्या अशाच एका जोडप्याची चर्चा होत आहे, जे क्षणार्धात कोट्यधीश झाले आहेत.

खरंतर या जोडप्याच्या नशिबाने त्यांना अशी साथ दिली की ते २० कोटींच्या आलिशान बंगल्याचे मालक बनले आहे. फक्त २५०० रुपये खर्च करून लॉटरीचे तिकीट घेतलं होतं आणि त्या तिकिटामुळं त्यांना सुमारे २० कोटींचं घर मिळालं. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्याला लॉटरी जिंकल्याची माहिती मिळाली तेव्हा त्याचा विश्वासच बसला नाही, कारण त्यानं याआधी जवळपास ९ वेळा तिकिटं खरेदी केली होती, पण त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. मात्र, दहाव्यांदा नशिबानं साथ दिली आणि चपराक फाडून त्याला कोट्याधीश बनवलं.

दुसऱ्या देशात मिळालाय लॉटरीत लागलेला बंगला
ब्रिटनच्या ५५ वर्षीय पतीचं नाव मार्क आहे, तर त्याच्या पत्नीचं नाव डेबोरा आहे. मार्क कायदेशीर सल्लागार आहे आणि डेबोरा वेलनेस कोच आहे. या जोडप्यानं 'ओमेझ मिलियन पाउंड हाउस' लॉटरीत २० कोटींचा आलिशान बंगला जिंकला आहे. ब्रिटनमधील लॉटरीत त्याला घर मिळालं नसलं तरी ते घर स्पेनमधील मार्बेला येथे आहे. मारबेला हे जगातील सर्वात मोहक शहरांपैकी एक मानलं जातं. विशेष म्हणजे लॉटरी विजेत्याला दुसऱ्या देशात घर देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: british couple won luxurious house worth 20 crore in a lottery jackpot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.