स्वीमिंगसाठी गेलेली व्यक्ती झाली होती बेपत्ता, शार्कच्या पोटात सापडला हात आणि लग्नाची रिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:08 PM2019-11-08T12:08:48+5:302019-11-08T12:10:46+5:30
स्थानिक प्रशासनाने हा शार्क ठार केला. त्याला कापल्यावर त्याच्या पोटात एक हात आणि वेडिंग रिंग सापडली.
स्कॉटलॅंडचा एक पर्यटक रियूनियन बेटावर फिरायला गेला होता. हे बेट मेडागास्करपासून ८०० किलोमीटर दूर हिंदमहासागरात आहे. हा पर्यटक स्वीमिंग करताना हरवला होता. दोन दिवस त्याचा शोध घेतला असता काहीच हाती लागलं नाही. त्यानंतर या बेटावरील समुद्रात एका शार्क दिसला. स्थानिक प्रशासनाने हा शार्क ठार केला. त्याला कापल्यावर त्याच्या पोटात एक हात आणि वेडिंग रिंग सापडली.
बायकोसोबत फिरायला आला होता
पत्नी आणि ४४ वर्षीय व्यक्ती रियूनियन बेटावर फिरायला गेला होता. येथील हर्मिटेज लगून किनाऱ्यावर तो स्वीमिंग करण्यासाठी गेला होता. पण बराच वेळ होऊनही तो परत आला नाही तेव्हा त्याच्या पत्नीने पोलिसांना फोन केला. स्थानिक प्रशासनाने बराच वेळ हेलिकॉप्टर आणि नावेच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला. पण तो कुठेच दिसला नाही. इतकेच काय तर डायवर्सना पण तो सापडला नाही.
...म्हणून शार्कला मारलं
दुसऱ्या दिवशी या समुद्रात शार्क दिसला. पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने शार्कला मारलं. या शार्कचं परिक्षण करण्यात आलं. या शार्कच्या पोटात अंगठी घातलेला एक हात सापडला. पण अजून हे स्पष्ट झालं नाही की, हा त्या व्यक्तीचा आहे की नाही. पण अंगठी त्याच व्यक्तीची आहे.
या बेटाव टायगर शार्क अधिक प्रमाणात आढळतात. असं म्हटलं जातं की, २०११ पासून आतापर्यंत २४ वेळा शार्कने इथे मनुष्यांवर हल्ले केले. यातील ११ पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला.