एक अशीही अनोखी स्पर्धा, महिलांना पडद्यामागे लपवून पायांना दिलं जात होतं रेटींग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:13 AM2023-05-05T09:13:56+5:302023-05-05T09:15:48+5:30

British Prettiest Ankle Competition: इंग्लंडमध्ये हा शो आयोजित केला जात होता. या स्पर्धेत सहभागी महिला आपलं शरीर लपवण्यासाठी पडद्यामागे उभ्या राहत होत्या किंवा बसत होत्या.

British used to do this by looking at the feet of girls in era of 1900 you will be ashamed | एक अशीही अनोखी स्पर्धा, महिलांना पडद्यामागे लपवून पायांना दिलं जात होतं रेटींग!

एक अशीही अनोखी स्पर्धा, महिलांना पडद्यामागे लपवून पायांना दिलं जात होतं रेटींग!

googlenewsNext

British Prettiest Ankle Competition: बऱ्याच तरूणींनी त्यांच्या स्कूल आणि कॉलेजच्या काळात ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला असेल. काही महिला जागतिक स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतात. जसे की, मिस यूनिव्हर्स, मिस वर्ल्ड, मिस्टर वर्ल्ड, मिसेज वर्ल्ड आणि मिस सुपरनॅच्युरल इत्यादी. पण तुम्हाला माहीत आहे का की, 1900 शतकाच्या सुरूवातीला महिलांच्या ब्युटी कॉन्टेस्टपैकी एक प्रिटी एंकल कॉम्पिटीशन होत होतं. इंग्लंडमध्ये हा शो आयोजित केला जात होता. या स्पर्धेत सहभागी महिला आपलं शरीर लपवण्यासाठी पडद्यामागे उभ्या राहत होत्या किंवा बसत होत्या.

महिला पडद्यामागे यासाठी लपत होत्या जेणेकरून जज केवळ त्यांना स्टॉकिंग्स आणि पायांमध्ये शूज घालून बघू शकतील. डेली मेलनुसार, एक जज जो नेहमी एक पोलीस अधिकारी असायचा तो महिलांचे पाय बघायचा आणि सगळ्यात सुंदर पाय असलेल्या महिलेला विजयी घोषित करत होता. 
महिला निरीक्षणासाठी आपले पाय वर उचलत होत्या आणि जज त्यांच्या मापाचा अंदाज लावत होते. पडदा असण्याचं कारण हे होतं की, कोणतीही महिला वयाची पर्वा न करता या स्पर्धेत भाग घेऊ शकत होती. सध्या ट्विटरवर एक मोनोक्रोम फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात सूट-बूट घालून एक व्यक्ती पायांची पाहणी करत आहे आणि त्यांना नंबर देत आहे.

व्हायरल झालेला हा फोटो @info_tale नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, '1950 मध्ये एक व्यक्ती फ्रान्सच्या पॅरिसमध्ये सगळ्या सुंदर पायांच्या स्पर्धेत परिक्षण करताना'. अशा स्पर्धा सामान्यपणे होजरी कंपन्यांकडून मार्केटिंगच्या दृष्टीने आयोजित केल्या जातात. त्यावेळी केवळ सगळ्यात सुंद एंकलच नाही तर सगळ्यात सुंदर आर्म्स, खांदे आणि पायांसाठी स्पर्धा होत होत्या. पण या स्पर्धा 1940 च्या शेवटपर्यंत सुरू होत्या आणि जगभरात या स्पर्धा होत होत्या. नंतर हीच आयडिया ब्युटी कॉन्टेस्टमध्ये डेव्हलप झाली.
 

Web Title: British used to do this by looking at the feet of girls in era of 1900 you will be ashamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.