शरीरसंबंधासाठी पतीला झोपेतून उठवण्याच्या नादात महिला पडली, अर्ध्या शरीराला मारला लकवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:07 PM2021-08-03T14:07:17+5:302021-08-03T14:24:42+5:30
सोफी रॉजर्ससोबत ही घटना साधारण दोन वर्षाआधी घडली होती. यादरम्यान तिचे तीन ऑपरेशनही करण्यात आले. तिच्या मानेत टायटेनियमचे रॉड टाकण्यात आले.
ब्रिटनच्या लंडन शहरात राहणाऱ्या एका महिलेला रात्री पतीला शारीरिक संबंधासाठी उठवणं महागात पडलंय. महिला इंटिमसीसाठी पतीला उठवण्याच्या प्रयत्नात बेडवरून खाली पडली आणि बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. महिलेच्या शरीराचा एक भाग पॅरालाइस्ड झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती व्हीलचेअरवर आहे.
सोफी रॉजर्ससोबत ही घटना साधारण दोन वर्षाआधी घडली होती. यादरम्यान तिचे तीन ऑपरेशनही करण्यात आले. तिच्या मानेत टायटेनियमचे रॉड टाकण्यात आले. आज स्थिती अशी आहे की, आधार घेऊन ती हळूहळू चालते. पण तरी सुद्धा तिचा जास्तीत जास्त वेळ हा व्हीलचेअरच जातो. ती आता तिचा आणि शरीराच्या वरच्या भागाला थोडं उचलू शकते.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ४४ वर्षीय सोफी रॉजर्स म्हणाली की, 'मी आता आधीसारखी राहिलेली नाही. माझा कॉन्फिडन्स संपला आहे. असं वाटं की, जसं माझी आत्मा एखाद्या दुसऱ्या शरीरात टाकली आहे'. ती म्हणाली की, घटनेच्या दिवशी तिला पतीसोबत इंटिमेट व्हायचं होतं. म्हणजे शरीरसंबंध ठेवायचे होते. त्यामुळे ती पतीला उठवण्याचा प्रयत्न करत होती.
सकाळी पती झोपेतून उठला तर त्याला सोफी बेशुद्ध पडलेली दिसली. तिचे हात-पाय काम करत नव्हते. यानंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, पडल्याने सोफीच्या पाठीच्या कण्याला इजा झाली आहे. ज्यामुळे तिला लकवा मारला.