एकमेकाच्या प्रेमात पडले भाऊ-बहीण, कुटुंबियांना सांगण्यासाठी ग्रुपवर टाकला अश्लील फोटो आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 02:29 PM2023-03-24T14:29:06+5:302023-03-24T14:29:22+5:30
दोघेही सोबत खेळत लहानाचे मोठे झाले आणि कमी वयातच दोघांमध्ये चांगली मैत्री झली होती. तरूण झाले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा कुटुंबियांना हे समजलं तेव्हा त्यांनी दोघांना वेगळं केलं.
प्रेम कहाण्या ऐकायला तोपर्यंत चांगल्या वाटतात जोपर्यंत त्या इतरांना विचलित करत नाहीत. अशीच एक कहाणी अमेरिकेतून समोर आली. दोघे प्रेमात पडले, लग्न झालं, बाळ झालं...पण अजब बाब ही आहे की, दोघेही भाऊ-बहीण आहेत. भारतासारख्या देशात भाऊ-बहिणीच्या नात्याला पवित्र आणि सुंदर मानलं जातं. तेच परदेशात हे नातं लोकांनी बदनाम केलं आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकाच्या उटाहमध्ये राहणारा मायकल ली आणि एंजेला पेंग चुलत भाऊ-बहीण होते. दोघेही एकमेकांचे फर्स्ट कजिन (काका-काकी, मामा-मामी, आत्याचे अपत्य) होते. पण दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघे अमेझॉन प्राइमच्या एक्स्ट्रीम लव शोमध्येही आले आहेत. ज्यात त्यांनी त्यांच्या जीवनाबाबत सांगितलं होतं.
दोघेही सोबत खेळत लहानाचे मोठे झाले आणि कमी वयातच दोघांमध्ये चांगली मैत्री झली होती. तरूण झाले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा कुटुंबियांना हे समजलं तेव्हा त्यांनी दोघांना वेगळं केलं. अनेक वर्ष दोघे एकमेकांना भेटले नाहीत. त्यांची लग्नेही वेगवेगळ्या व्यक्तीसोबत झाली. पण दोघांचीही लग्ने 10 वर्षानी मोडली. अनेक वर्षानी जेव्हा ते एका फॅमिली फंक्शनमध्ये भेटले तेव्हा त्यांना जाणवलं की, त्यांच्या एकमेकाबाबत अजूनही प्रेम बाकी आहे. त्यांनी गुपचूप एकमेकांना डेट करणं सुरू केलं.
डेटिंग करताना त्यांना जाणवलं की, कुटुंबियांना या नात्याबाबत सांगितलं पाहिजे. तेव्हा त्यांनी फार अजब निर्णय घेतला. नात्याचा खुलासा करण्यासाठी त्यांनी एकमेकांना किस करतानाचा फोटो फेसबुकवर फॅमिली ग्रुपवर पोस्ट केला.
हा फोटो बघून कुटुंबिय हैराण झाले आणि त्यांना हे महागात पडलं. कारण त्यांना वाटत होतं की, कुटुंबिय ऐकतील. पण त्यांचं हे नातं कुणीही मान्य केलं नाही. अनेक लोकांनी त्यांच्याशी बोलणं बंद केलं. विरोधात जाऊन दोघांनी लग्न केलं. 2020 मध्ये त्यांना एक बाळही झालं. 2021 मध्ये मायकलचं निधन झालं आणि आता एंजेला सिंगल मदर आहे.