अब्जाधीशाने विजेच्या झटक्याने केली प्रायवेट पार्टची थेरपी, खर्च वाचून लोक हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 03:58 PM2023-08-19T15:58:03+5:302023-08-19T16:00:05+5:30
Rejuvenation therapy with electricity: दरवर्षी फिजिकली फीट राहण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केलेले टेक मुघल जॉनसन यांनी मुलाचं रक्त घेतल्यानंतर आता नवीन थेरपी घेत आहेत.
Rejuvenation therapy with electricity: स्वत:ला नेहमीच तरूण ठेवण्यासाठी अमेरिकेतील एक बिझनेसमन ब्रायन जॉनसन (Bryan Johnson) एक फारच वेगळं काम केलं. दरवर्षी फिजिकली फीट राहण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केलेले टेक मुघल जॉनसन यांनी मुलाचं रक्त घेतल्यानंतर आता नवीन थेरपी घेत आहेत. ज्याबाबत वाचून सगळेच हैराण झाले आहेत.
तेच दुसरीकडे 45 वर्षीय जॉनसन यांचं मत आहे की, त्यांचा उद्देश हे निश्चित करणं आहे की, त्यांचा मेंदू, लिव्हर, किडनी, त्वचा, दात, केस आणि प्रायवेट पार्ट तसंच काम करावं जसं 18 वयात करत होतं.
धक्कादायक खुलासा
'डेली मेल' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जॉनसन आपल्या या उद्देशाबाबत फार सतर्क आणि संवेदनशील आहे. त्यांनी आपला डाएट असा बनवला आहे की, सकाळी 11 नंतर ते काहीच खात नाहीत. आता त्यांनी आणखी एक नवीन प्रयोग करून जगाला हैराण केलं आहे. ज्याबाबत वाचूनही तुम्हीही अवाक् व्हाल. ब्रायन जॉनसन यांनी घोषणा केली आहे की, त्यांनी पेनिस रेज्युवेनेशन थेरपी सुरू केली आहे.
आपलं ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म ब्रेनट्रीच्या माध्यमातून कमाई करणारे अब्जाधीश उद्योगपती आपलं आरोग्य चांगलं करण्यासाठी आणि स्वत:चं वय कमी करण्यासाठी शक्य तो प्रयत्न करत आहेत.
त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घोषणा केली आहे की, ते त्यांच्या लैंगिक क्षमतेत सुधारणा आणण्यासाठी शॉक थेरपी घेत आहेत. जॉनसन यांनी सांगितलं की, आतापर्यंत झालेल्या टेस्टमधून समजलं आहे की, शॉकवेव्ह थेरपी जबरदस्त काम करते. त्यांनी हेही सांगितलं की, या थेरपीमुळे त्यांच्या लव्हलाइफमध्ये सुधारणा झाली आहे. एकूण सहा वेळा त्यांना ही खास ट्रीटमेंट करावी लागेल. या शॉकवेव्ह थेरपीसाठी दरवेळी लाखो रूपये खर्च होतात.