तब्बल १ वर्ष टिकला बबल, शास्ज्ञज्ञ म्हणाले हा तर जादुई बबल, पाहुन डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 07:06 PM2022-01-26T19:06:21+5:302022-01-26T19:09:04+5:30

बबल हवेत जाताच अवघे काही सेकंद किंवा अगदी मिनिटभरासाठी तसे राहतात त्यानंतर ते आपोआप फुटतात. असा बबल तब्बल एक वर्षे तसाच राहिला तो एक वर्षांनी फुटला असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... कदाचित विश्वासच बसणार नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असाच एक बबल तब्बल ४६५ दिवस टिकला आहे.

bubble lasted for 465 days | तब्बल १ वर्ष टिकला बबल, शास्ज्ञज्ञ म्हणाले हा तर जादुई बबल, पाहुन डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

तब्बल १ वर्ष टिकला बबल, शास्ज्ञज्ञ म्हणाले हा तर जादुई बबल, पाहुन डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

googlenewsNext

बबल उडवायला किंवा फोडायला कुणाला आवडत नाही. लहानपणीच नाही तर अगदी आताही तुम्ही कधी ना कधी बबल उडवण्याचा आणि तो फोडण्याचा आनंद घेतच असाल. बबल हवेत जाताच अवघे काही सेकंद किंवा अगदी मिनिटभरासाठी तसे राहतात त्यानंतर ते आपोआप फुटतात. असा बबल तब्बल एक वर्षे तसाच राहिला तो एक वर्षांनी फुटला असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... कदाचित विश्वासच बसणार नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असाच एक बबल तब्बल ४६५ दिवस टिकला आहे (Magical Bubble Lasted 465 days). ४६५ दिवसांनंतर हा बबल फुटला आहे (Bubble Popped After 465 Days).

बबल्स जितके दिसायला सुंदर तितकेच ते नाजूकही असतात. त्यांचा आकार जितका तितकी त्यांची टिकण्याची क्षमता कमी असते. साबणाचे बबल्स काही सेकंदात फुटतात. पण काळजी घेतली तर ते काही मिनिटांपर्यंत राहतात. यामागे ग्रॅव्हिटेशनल ड्रेनजचं (gravitational drainage) विज्ञान काम करतं. म्हणजे बबल्समधील गॅस साबणाच्या मेम्बरेनसोबत डिफ्युज होतात आणि बबल्स हवेत फुटतात.  पण शास्त्रज्ञांनी एक असा खास मॅजिकल बबल तयार केला (Scientists Create Strong Bubble). जो वर्षभर टिकू शकतो.

फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिलेच्या (University of Lille, France) शास्त्रज्ञांनी बबल्सवर अभ्यास केला. बबल्सचा नाजूकपणा आणि तो कसा फुटतो याबाबत त्यांनी रितसर माहिती मिळवली. त्यांनी असा बबल तयार केला जो त्याच्या आकार आणि प्रकारासोबत वर्षभर टिकू शकतो.

त्यांनी गॅस मार्बल तयार केला, जे पाण्यासोबत छोटं नायलॉन पार्टिकल बनवत होतं. या लिक्विडचे बबल्स काही मिनिटं किंवा तासभर टिकले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी ग्लिसेरॉल, रंगहीन, गंधहीन, वेस्कॉस लिक्विड आणि काही फार्मा प्रोडक्ट्सला गॅस मार्बल्समध्ये मिसळलं आणि एक जादुई बबल तयार केला. जो पूर्ण एक वर्ष आणि दहा दिवस टिकला.

शास्त्रज्ञांच्या मते, बबल्सची टिकण्याची क्षमता वाढवण्यात ग्लेसरॉल हा सर्वात मुख्य घटक होता. ज्या वाष्पीकरणामुळे बबल्स फुटत होते, त्याला ग्लेसरॉलने कमी केलं आणि हवेतील आर्द्रता शोषून घेतली. लिक्विडमधील प्लॅस्टिक पार्टिक्लसनी यातील पाण्याचा प्रवाहही रोखला, ज्यामुळे बबल्स बराच कालावधी राहिला. आतापर्यंत कोणता बबल्स ४६५ दिवस टिकला नव्हता. त्यामुळे हा एक वैज्ञानिक चमत्कारच आहे.

Web Title: bubble lasted for 465 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.