Budget 2020 : बाबो! 'इथे' मंत्री हवी असेल तर दारू पिऊनही सादर करू शकतात आर्थिक बजेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:58 PM2020-02-01T12:58:51+5:302020-02-01T13:02:06+5:30

बजेट सादर करण्याची तर सगळ्यांना चांगली माहीत आहे. पण बजेटबाबतची एक आश्चर्यकारक गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

Budget 2020 : Chancellor can be present budget after drinking Alchohol in Britain Parlialment house of commons | Budget 2020 : बाबो! 'इथे' मंत्री हवी असेल तर दारू पिऊनही सादर करू शकतात आर्थिक बजेट!

Budget 2020 : बाबो! 'इथे' मंत्री हवी असेल तर दारू पिऊनही सादर करू शकतात आर्थिक बजेट!

Next

केंद्र सरकारचं आर्थिक बजेट म्हटलं की, सगळ्याच्य नजरा वेगवेगळ्या योजनांवर आणि टॅक्सवर लागतात. भारताप्रमाणे वेगवेगळ्या देशातील सरकार त्यांचे बजेट सादर करतात. बजेट सादर करण्याची तर सगळ्यांना चांगली माहीत आहे. पण बजेटबाबतची एक आश्चर्यकारक गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. एका देशातील मंत्री हवं असेल तर दारू पिऊनही बजेट सादर करू शकतो. 

हा देश आहे ब्रिटन. इथे असा कायदा आहे की, बजेटच्या दिवशी चान्सलर हवं असेल तर दारू पिऊन बजेट सादर करू शकतो. ब्रिटनच्या संसदेत बजेट सादर करणाऱ्या मंत्र्याला चान्सलर म्हटलं जातं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटनची संसद हाऊस ऑफ कॉमन्सच्या नियम पुस्तिकेत असा कायदा करण्यात आला आहे. यात लिहिण्यात आलं आहे की, या दिवशी दारू पिण्याची परवानगी फक्त चान्सलरला असेल, तेही  एका दिवसासाठी. त्यानंतर त्याला त्यानंतर संसदेत दारू पिऊन येता येणार नाही. असे मानले जाते की, ब्रिटनमध्ये हा नियम अनेक वर्षांपासून सुरू आहे. 

ब्रिटनच्या बजेटबाबत आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे इथे बजेट सादर करण्यासाठी १०० वर्षांपासून एका ब्रीफकेसचा वापर केला गेला होता. ही ब्रीफकेस १८६० मध्ये ब्रिटनचे चान्सलर विलियम ग्लॅडस्टोन यांनी तयार केली होती. या ब्रीफकेसचं नाव  स्कारलेट होतं.

नंतर १९६५ मध्ये तत्कालीन चान्सलर जेम्स कॅलेघन यांनी वेगळी ब्रीफकेस तयार केली. तर १९९७ मध्ये चान्सलर गार्डन ब्राउन यांनी बजेट सादर करण्यासाठी वेगळी बॅग मागवली. २०११ मध्ये ब्रिटनचे चान्सलर जॉर्ज ऑसबॉर्नने बजेट सादर करण्यासाठी १५१ वर्ष जुन्या ब्रीफकेसचा वापर केला होता.

Web Title: Budget 2020 : Chancellor can be present budget after drinking Alchohol in Britain Parlialment house of commons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.