Budget 2020 : कुठे शारीरिक संबंधावर तर कुठे लघवीवर टॅक्स, जगभरातील टॅक्सची अविश्वसनिय व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:42 PM2020-02-01T12:42:31+5:302020-02-01T12:43:27+5:30
जर इतिहासात डोकावून पाहिलं तर काही अजब गोष्टींवर टॅक्स लावल्याच्या घटना वाचायला मिळतात. यातील काही गोष्टी तर अशा आहेत की, त्यावर विश्वासही बसत नाही.
नेहमीप्रमाणे यावेळी नोकरदारांना टॅक्समध्ये कपात होण्याची अपेक्षा आहे. टॅक्स हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे. अशात जर इतिहासात डोकावून पाहिलं तर काही अजब गोष्टींवर टॅक्स लावल्याच्या घटना वाचायला मिळतात. यातील काही गोष्टी तर अशा आहेत की, त्यावर विश्वासही बसत नाही.
सेक्स टॅक्स
जर्मनीमध्ये वेश्या व्यवसाय हा कायदेशीर असला तरी इथे सेक्स टॅक्ससारखे कायदे आहेत. २००४ मध्ये करण्यात आलेल्या या टॅक्स कायद्यानुसार प्रत्येक प्रॉस्टिट्यूला शहराला १५० यूरो दर महिन्याला द्यावे लागतील. पार्ट टायमर्सना दिवसभरातील कमाईतील ६ यूरो द्यावे लागतील. या टॅक्समुळे इथे १ मिलियन यूरोचं वार्षिक उत्पन्न होतं.
सोल(आत्मा) टॅक्स
इंग्लंडचे हेन्री VIII, त्यांची मुलगी एलिझाबेथ I आणि रशियाचे पीटर द ग्रेट यांनी दाढीवरही टॅक्स लावला होता. पीटर द ग्रेट यांनी तर आत्म्यावर टॅक्स लावला होता. म्हणजे ज्या लोकांच्या आत्म्यावर विश्वास होता त्यांच्याकडून हा टॅक्स वसूल केला जात होता.
ब्रेस्ट टॅक्स
तुम्ही कधी ब्रेस्ट टॅक्सबाबत ऐकलं का? नाही ना? पण इतिहासात असं झालं आहे. टॅक्स कलेक्टर्स ब्रेस्टचं माप घेऊन त्यानुसार टॅक्स वसूल करत होते. त्यामुळे एका तरूणीने स्वत:चं ब्रेस्ट कापून टॅक्स कलेक्टर्सना दिलं होतं.
बॅचलर टॅक्स
ज्यूलिअस सीजरने इंग्लंडमध्ये १६९५ मध्ये, पीटर द ग्रेटने बॅचलर टॅक्स १७०२ मध्ये लागू केला होता. मुसोलिनीने सुद्धा १९२४ मध्ये २१ वर्ष ते ५० वयोगटातील अविवाहित पुरूषांवर बॅचलर टॅक्स लावला होता. बॅचलर्सना कपड्यांविनाच बाजारात फिरावं लागत होतं.
यूरिन टॅक्स
रोमचा राजा वेस्पेशनने पब्लिक यूरिनलवर टॅक्सची व्यवस्था केली होती. इतकेच नाही तर इंडस्ट्री वापरासाठी यूरिनच्या सेलनेही उत्पन्न कलेक्ट करण्याची व्यवस्था केली होती.
टॅटू टॅक्स
(Image Credit : Social Media)
ऑरकॅंससमध्ये जर कुणी टॅटू, बॉडी पिअर्सिंग किंवा इलेक्ट्रोलीसीस ट्रीममेंट करत असेल तर त्यांना सेल्स टॅक्स अंतर्गत ६ टक्के टॅक्स द्यावा लागत होता.
फॅट टॅक्स
खाण्यातील फॅटच्या प्रमाणानुसार टॅक्स. डेन्मार्क आणि हंगेरीसारख्या देशांमध्ये चीज, बटर आणि पेस्ट्री सारख्या हाय कॅलरी पदार्थांवर फॅट टॅक्स लावला आहे. या टॅक्सच्या अंतर्गत ते सर्वच पदार्थ येतात ज्यात २.३ टक्क्यांपेक्षा जास्त सॅच्युरेटेड फॅट आहे.
नशेवर टॅक्स
कॅलिफोर्नियामध्ये गांजाच्या वापरावर टॅक्स कायदा लागू केला आहे. अल्कोहोलच्या वापरावरही टॅक्सबाबत काही कायदे आहेत. भारतात सिगारेट आणि तंबाखूवर भरपूर टॅक्स लागतो.