काय सांगता? चक्क म्हशीची डीएनए चाचणी होणार; कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 11:23 AM2021-03-10T11:23:09+5:302021-03-10T12:15:09+5:30

उत्तर प्रदेशातल्या अजब घटनेची सर्वत्र चर्चा; म्हैशीची डीएनए चाचणी करण्याची मागणी

Buffalo Theft Case In Shamli Farmer Demands Dna Test Wrote Letter To Sp | काय सांगता? चक्क म्हशीची डीएनए चाचणी होणार; कारण वाचून चक्रावून जाल

काय सांगता? चक्क म्हशीची डीएनए चाचणी होणार; कारण वाचून चक्रावून जाल

Next

मेरठ: समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आजम खान यांची म्हैस चोरीला गेल्याची घटना ताजी असताना आता शामली जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. शामली जिल्ह्यातून एक म्हैस चोरीला गेली होती. आता ती सापडली आहे. मात्र या म्हैशीचा मालक कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दोन शेतकऱ्यांनी म्हैस आपलीच असल्याचा दावा केला आहे. त्यातल्या एका शेतकऱ्यानं म्हैशीची डीएनए चाचणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग...

पश्चिम उत्तर प्रदेशातल्या शामली जिल्ह्यातल्या अहमदगढचे रहिवासी असलेल्या चंद्रपाल यांची म्हैस गेल्या ऑगस्ट महिन्यात चोरीला गेली. दहा दिवसांत तुमची म्हैस शोधून देऊ असं आश्वासन त्यांना पोलिसांनी दिलं होतं. मात्र पोलिसांना म्हैस शोधण्यात अपयश आल्याचं चंद्रपाल यांनी सांगितलं. सहारनपूर जिल्ह्यातल्या गंगोहमधल्या बिनापूर गावातल्या एका शेतकऱ्याकडे आपली म्हैस असल्याचा दावा त्यांनी केला.

काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

मीच म्हैशीचा खरा मालक असल्याचा दावा करणाऱ्या शेतकऱ्यानं या प्रकरणी डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली आहे. 'म्हैशीची आई जिवंत आहे. ती माझ्या घराजवळ बांधलेली आहे दोघांची डीएनए चाचणी केल्यास सत्य समोर येईल,' असं शेतकऱ्यानं म्हटलं आहे. यासाठी चंद्रपालनं एसपींना पत्रसुद्धा लिहिलं आहे. या प्रकरणात एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

चंद्रपाल पोलिसांना घेऊन सहारनपूरमधल्या बिनापूर गावातही जाऊन गेला. तिथे एका म्हैशीला बांधून ठेवण्यात आल्याचं दिसलं. ती म्हैस आपलीच असल्याचा दावा त्यानं केला. पण बिनापूरमध्ये राहणाऱ्या सत्यवीर नावाच्या शेतकऱ्यानं ती म्हैस आपली असल्याचा दावा केला. त्यामुळे मोठा वाद झाला. गावचे सरपंच आणि ग्रामस्थ सत्यवीर यांची बाजू घेतली. त्यामुळे चंद्रपाल आणि पोलिसांना परतावं लागलं.

Web Title: Buffalo Theft Case In Shamli Farmer Demands Dna Test Wrote Letter To Sp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.