बाबो! आगीत जळून राख झालं होतं घर, आता २.९५ कोटी रूपयांना विकलं जातंय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 03:12 PM2021-10-04T15:12:45+5:302021-10-04T15:17:14+5:30
आता सर्वांनाच प्रश्न पडला की, यात असं काय आहे की, कोळसा झालेलं घर इतकं महाग विकलं जात आहे.
जे लोक प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीच्या कामात असतात त्यांना हे माहीत असतं की, एका नव्या बंगल्याची किंमत काय असते आणि एका जुन्या घराची किंमत किती असते. मात्र, आश्चर्य या गोष्टीचं आहे की, एक पूर्णपणे जळून कोळसा झालेलं घर कोट्यावधी रूपयांमध्ये विकलं जात आहे. आता सर्वांनाच प्रश्न पडला की, यात असं काय आहे की, कोळसा झालेलं घर इतकं महाग विकलं जात आहे. हे घर २.९५ कोटी रूपयांना विकलं जात आहे.
हे एक तीन बेडरूमचं घर आहे. जे यूएसच्या Melrose मध्ये आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये या घराला भीषण आग लागली होती. ज्यात हे घर वाईटप्रकारे जळालं होतं. आता हे घर विक्री आहे आणि याची किंमत २.९५ कोटी रूपये मागितली जात आहे.
मेलरोज फायर कॅप्टन पीटर ग्रांटने सांगितलं की, जेव्हा घराला आग लागली होती, तेव्हा याच्या खिडक्या जळाल्या होत्या. भींती आणि छतही आगीच्या कचाट्यात आली होती.
मालकाने घर विकण्याची जी जाहिरात दिली आहे त्यात त्याने दिलंय की, हे घर पुन्हा बांधावं लागेल. हे घर १९६० मध्ये बनवण्यात आलं होतं. आता ते या जळालेल्या घराचे कोट्यावधी रूपये मागत आहेत. इतकंच काय तर प्रॉपर्टीशी निगडीत इंडस्ट्री गुप्सनेच याची किंमत इतके कोटी रूपये लावली आहे. पण ही किंमत वाचून लोक हैराण झाले आहेत.