पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 06:03 PM2021-02-12T18:03:55+5:302021-02-12T18:14:19+5:30
अनेक महिन्यांपासून कंपनीकडून पगार कापला जात असल्यामुळे कर्नाटकातील रहिवासी असलेल्या एका बस कंडक्टरनं फेसबुकवर किडणी विकायचं ठरवलं आहे.
कोरोनामुळे (CoronaVirus) जगभरातील अनेक कंपन्यांचे लोक बेरोजगार (unemployment) झाले. यादरम्यान अनेकांची नोकरी गेली तर काही कंपन्यानी कामगारांची पगार कपात केली. यामुळेच अनेकांना घर चालवणं सुद्धा कठीण झालं होतं. पैसै मिळवण्यसाठी लोकांनी वेगवेगळे मार्ग शोधायला सुरूवात केली. अनेक महिन्यांपासून कंपनीकडून पगार कापला जात असल्यामुळे कर्नाटकातील रहिवासी असलेल्या एका बस कंडक्टरनं फेसबुकवर किडणी विकायचं ठरवलं आहे. ३८ वर्षीय हनुमंत कलेगा यांनी सांगितले की'' गेल्या अनेक महिन्यांपासून पगार कापला जात असल्यामुळे घर चालवणं कठीण झालं होतं. म्हणूनच मी फेसबुकवर किडणी विकण्याची जाहिरात दिली.''
फेसबुकवर व्यक्त केले आपले दुःख
हनुमंत यांनी फेसबुकवर पोस्ट केलेला फोटो तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, तो एक वाहतुक सेवेतील कर्मचारी आहे. त्यांच्याकडे घरातील रेशन आणि घराचं भाडं द्यायला पैसै नाहीत. म्हणून ते आपली किडनी विकू इच्छित आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये आपला फोननंबर देत सांगितले की, हनुमंत North East Karnataka Road Transport Corporation (NEKRTC) ... गंगावती डेपोमध्ये काम करत होते.
हनुमंत या आधी बँगलुरू मेट्रोपॉलिटीयन ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये काम करत होते.
शाब्बास पोरा! १० वीच्या मुलानं भंगारापासून बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक, अन् वडील म्हणाले.....
कोरोनामुळे त्यांचा पगार कापण्यात आला होता. त्यामुळे घरखर्च भागवता येत नव्हता. म्हणून किडनी विकण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नसल्याचे ते सांगतात. याच अर्धवट पगारात भाडं द्यावं लागत होतं तसंच मुलांच्या शाळेची फी द्यावी लागत होती. म्हणून किडनी विकण्याचा विचार मनात आला.
ट्रांसपोर्ट कंपनीने लावले आरोप
या प्रकरणाबाबत NEKRTC's Koppal Divisional Controller एम ए मुल्ला ... यांनी सांगितले की, ''हनुमंत कामावर रोज येत नसत. कधीतरी येत होते म्हणून त्यांचा पगार कापला जात होता. वारंवार त्यांना वेळेवर येण्यास सांगण्यात आलं होतं. अशा स्थितीत कंपनीवर कमी पगार देण्याचा आरोप लावणं चुकीचं आहे. '' कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांबरोबर पोलिसांनी जे केलं ते पाहून मालकांचे डोळे उघडेच राहिले, पाहा व्हिडीओ