जुगारात ४० कोटी हरल्यानंतर उद्योगपतीने कसीनोवर ठोकली केस, म्हणाला - मला जुगार का खेळू दिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 04:10 PM2022-02-01T16:10:26+5:302022-02-01T16:12:17+5:30
मलेशियाच्या या बिझनेसमनची ओळख लिम हान जोह अशी पटली आहे. लिम २०१५ मध्ये मलेशियाहून लंडनला बिझनेस ट्रिपवर गेला होता.
'उल्टा चोर कोतवाल को डांटे' या हिंदी म्हणीला साजेशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. आपली चूक लपवण्यासाठी लोक त्यांचा दोष दुसऱ्यांवर थोपवतात. असंच काही मलेशियातील एका श्रीमंत उद्योगपतीने केलं. या उद्योगपतीने लंडनच्या एका कसीनोमध्ये जुगार खेळत ४० कोटी रूपये गमावले. पण यासाठी त्याने स्वत:ला नाही तर कसीनोला जबाबदार धरलं. या व्यक्तीने कसीनोवरच केस ठोकली आहे.
मलेशियाच्या या बिझनेसमनची ओळख लिम हान जोह अशी पटली आहे. लिम २०१५ मध्ये मलेशियाहून लंडनला बिझनेस ट्रिपवर गेला होता. तिथे एका कसीनोमध्ये लिमने ४० कोटी रूपये गमावले. जेव्हा लिम सगळे पैसे हरला तेव्हा तो कसीनोवरच भडकला. त्याने कसीनोवर केस ठोकला आणि म्हणाला की, तो हे पैसे कसीनोवाल्याच्या चुकीमुळे हरला. तो म्हणाला की, कसीनोवाल्यांनी त्याला रोखलं का नाही? लिम म्हणाला की, कसीनोने मला जुगार खेळण्यापासून रोखायचं असतं. २०१५ तील या घटनेवरून त्याने आता कसीनोवर केस ठोकली आहे.
उद्योगपती लिम मलेशियातील सर्वात श्रीमंत बिझनेसमनपैकी एक आहे लिमची प्रॉपर्टी मलेशिया आणि लंडनमध्ये आहे. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, लिमची एकूण प्रॉपर्टी ४ अरब रूपयांच्या आसपास आहे. त्याने २०१४ मध्ये लंडनमधील एक प्रायव्हेट कसीनो जॉइन केला होता. यात लिम पैसे हरला होता. या कसीनोमध्ये लिम सगळे पैसे हरला होता. २०१५ पासून सुरू असलेल्या या केसमध्ये कोण जिंकेल आणि कोण हरेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लिमने कसीनोवर गॅंबलिंग अॅक्ट २००५ नुसार केस ठोकली आहे. आणि तो म्हणाला की, प्रसिद्ध लोकांना जुगार खेळण्यापासून रोखलं पाहिजे. लिमनुसार, कसीनोने त्याला जुगार खेळण्यापासून रोखायला हवं होतं. त्याने कसीनोवर आरोप लावला की, त्यांनी लालसेपोटी त्याला पुन्हा पुन्हा जुगार खेळण्यासाठी भाग पाडलं. त्यामुळे तोही पुन्हा पुन्हा जुगार खेळत राहिला. याच नादात त्याने ४० कोटी रूपये गमावले.