जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:02 PM2020-08-29T18:02:46+5:302020-08-29T18:06:31+5:30

जुगाड एक कला आहे. अनेक उद्योजग या कलेकडे आदराने पाहतात. नुकताच असाच एक जुगाड समोर आला आहे. या जुगाडाच्या सहाय्याने काही लोक मक्याचे दाणे काढत आहेत.

Businessman anand mahindra shares video of indian jugaad for corn goes viral | जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

Next

मुंबई - भारताच्या कानाकोपऱ्यातील तरुण सातत्याने काही ना काही जुगाड शोधून काढत असतात. कामे सोपी व्हावीत यासाठी भारतात जेवढे जुगाड शोधून काढले जातात आणि वापरले जातात, तेवढे क्वचितच एखाद्या देशात वापरले जात असतील. जुगाड एक कला आहे. अनेक उद्योजग या कलेकडे आदराने पाहतात. नुकताच असाच एक जुगाड समोर आला आहे. या जुगाडाच्या सहाय्याने काही लोक मक्याचे दाणे काढत आहेत. हे लोक हाताने नाही, तर चक्क दुचाकीच्या टायरने हे दाणे काढत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला आहे. 

आनंद महिंद्रा इम्प्रेस -
तरुणांच्या जुगाडाचा हा व्हिडिओ पाहून चक्क आनंद महिंद्रादेखील इम्प्रेस झाले आहेत. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकॉउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे, ‘मला अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी सातत्याने बघायला मिळते, ज्यात शेतकरी आपली दुचाकी अथवा ट्रॅक्टरचा वापर मल्टी-टास्किंग मशीन सारखा करतात. मी, अशा पद्धतीचा वापर करण्यासंदर्भात कधी स्वप्नातही विचार केला नसेल.’

काय आहे या व्हिडिओत -
या व्हिडिओत एक दुचाकी उभी केली आहे. तिचे चाक फिरत आहे. याच चाकाच्या टायरच्या सहाय्याने शेतकरी मकाचे दाणे काढत आहेत.

यापूर्वीही एका तरुणाची थोपटली होती पाठ -
यापूर्वीही आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, हा व्हिडिओ नक्की कुठला होता, हे त्यांनी सांगितले नसले तरी, व्हिडीओतील युवकाच्या भाषेवरून तो महाराष्ट्रातला असावा, असे समजते. या युवकाने महिंद्राच्या ट्रॅक्टरचा वेगळाच उपयोग करून घेतला. त्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने म्हशीचे दूध काढण्याचे यंत्र तयार केले आणि ते पाहून आनंद महिंद्रा  चकित झाले होते. 


 

महत्त्वाच्या बातम्या -

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

Web Title: Businessman anand mahindra shares video of indian jugaad for corn goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.