'या' कारणाने रोज 2 ग्लास मगरीचं रक्त पितो हा उद्योगपती, जाणून घ्या एका ग्लासची किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 02:24 PM2023-05-18T14:24:49+5:302023-05-18T14:25:16+5:30

थायलॅंडच्या ट्रांग प्रांतातील 52 वर्षीय रोजाकोर्न नॅनोन हे आपल्या दिवसाची सुरूवात एक ग्लास मगरीच्या रक्ताने करतात. यात ते लाओ खाओ मिठाचं थाई स्पिरिटही मिक्स करतात.

Businessman drinks crocodile blood twice a day to look beautiful and fit know the cost of 1 glass | 'या' कारणाने रोज 2 ग्लास मगरीचं रक्त पितो हा उद्योगपती, जाणून घ्या एका ग्लासची किंमत!

'या' कारणाने रोज 2 ग्लास मगरीचं रक्त पितो हा उद्योगपती, जाणून घ्या एका ग्लासची किंमत!

googlenewsNext

काही दिवसांआधी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती की, बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर तरूण दिसण्यासाठी सापाचं रक्त पितात. यात किती सत्यता आहे माहीत नाही. पण एका उद्योगपतीने दावा केला आहे की, तो फिट आणि तरूण राहण्यासाठी रोज दोनदा मगरीचं रक्त पितो. दक्षिण थायलॅंडचा राहणारा उद्योगपती म्हणाला की, त्याच्या चांगल्या आरोग्याचं हेच रहस्य आहे.

थायलॅंडच्या ट्रांग प्रांतातील 52 वर्षीय रोजाकोर्न नॅनोन हे आपल्या दिवसाची सुरूवात एक ग्लास मगरीच्या रक्ताने करतात. यात ते लाओ खाओ मिठाचं थाई स्पिरिटही मिक्स करतात. त्यानंतर रात्री झोपण्याआधी एक असंच कॉकटेल घेतात. रोजाकोर्न म्हणाले की, आधी त्यांना नेहमीच शारीरिक रूपाने कमजोरी आणि थकवा जाणवत होता. पण जेव्हापासून ते मगरीचं रक्त पिऊ लागले, त्यांच्या मोठा बदल झाला. आता त्यांना कधीच थकवा जाणवत नाही. कमजोरीही नसते. मगरीचं रक्त चमत्कारिकपणे काम करतं.

थायलॅंडमध्ये एका ठिकाणी भाज्या, फळं आणि फुलांसोबतच मगरीची शेतीही होते. इथे फॉर्म हाऊसमध्ये हजारो मगर पाळले जातात.  फॉर्म हाऊसचे मालक वनाचाई चाइकर्ड यांचा दावा आहे की, क्रॉक्‍समध्ये फार कमी रक्त असतं. फार फार तर एक किंवा दोन ग्लास. त्यामुळे हे पिण्यासाठी यात एक लाओ खाओसारखं एक अल्कोहोल मिक्स करावं लागतं.

या कॉकटेलच्या एका ग्लासाची किंमत 800 रूपये असते. फॉर्मचे मालक वनाचाई यांचा दावा आहे की, त्यांच्याद्वारे बनवण्यात आलेलं कॉकटेल शरीरात ब्लड सर्कुलेशन चांगलं करतं. लाल रक्तपेशी मजबूत करतं, प्लेटलेट्स काउंट आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढवतं. त्यांच्यानुसार हे प्यायल्याने मुल न होण्याची समस्याही दूर होते.

कॉकटेल तयार करण्यासाठी तीन ते चार वयाच्या मगरीचा बळी दिला जातो. कारण ते सगळ्यात मजबूत असतात, अशात त्यांच्या रक्ताचा प्रभाव शक्तीशाली होतो. एका मगरीमधून सामान्यपणे 100 मिलीमीटर रक्त काढलं जातं. मगरींची त्वचा, मांस आणि रक्त महाग विकलं जातं. त्यामुळेच यांना पाळलं जातं. थायलॅंडमध्ये मगरींचे एक हजारापेक्षा जास्त फॉर्म हाऊस आहेत. ज्यात साधारण 12 लाख मगरींना ठेवलं जातं. याच्या पित्तापासून आणि रक्ताचं औषध बनवलं जातं. पित्ताच्या औषधाची किंमत 76 हजार रूपये प्रति किलो आहे. तर मांसाची किंमत 570 रूपये किलो आहे. 
 

Web Title: Businessman drinks crocodile blood twice a day to look beautiful and fit know the cost of 1 glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.