काय सांगता? व्यापाऱ्यानं ९ लाखाला घेतला करामती दिवा; खरं कळल्यानंतर डोकं आपटत बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 05:42 PM2020-12-08T17:42:33+5:302020-12-08T17:57:13+5:30

Trending Viral News in Marathi : आरोपीने स्पेशल मॅग्नेटद्वारे विविध प्रकारे बल्ब पेटवून व्यावसायिकाचा विश्वास जिंकला. त्यानंतर ९ लाखांना दिवा विकून तेथून फरार झाले.

Businessman falls prey to fraud pays rs 9 lakh for karamati bulb | काय सांगता? व्यापाऱ्यानं ९ लाखाला घेतला करामती दिवा; खरं कळल्यानंतर डोकं आपटत बसला

काय सांगता? व्यापाऱ्यानं ९ लाखाला घेतला करामती दिवा; खरं कळल्यानंतर डोकं आपटत बसला

Next

दिल्लीतील एका व्यापाराला बरेलीतील काही भामट्यांनी ९ लाखांचा चुना लावला आहे. तीन तरूणांनी एका व्यापाऱ्याला ९ लाखांचा करामती दिवा विकला. या बल्बने धातूंची प्राप्ती होईल तसंच समृद्धी आणि भरभराट होईल. असं सांगून फसवणूक करण्यात आली.  हा आरोपी लखिमपूर येथिल रहिवासी असून लाखोंचा गंडा घालण्यासाठी आरोपींनी एक वेगळीच कहाणी रचली होती.  आरोपीने स्पेशल मॅग्नेटद्वारे विविध प्रकारे बल्ब पेटवून व्यावसायिकाचा विश्वास जिंकला. त्यानंतर ९ लाखांना दिवा विकून तेथून फरार झाले.

कोरोनाच्या माहामारीमुळे या व्यावसाईकाला आधीच खूप नुकसानाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सहजपणे पैसे कसे कमवता येतील याच्या शोधात तो होता. या मार्गामुळे व्यापाऱ्याला  होते तेव्हढे पैसे गमवावे लागले. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर छुटकन खान, मासूम खान आणि इरफान खान या तीन आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचवेळी पीडित व्यावसायिक आणि  तक्रारदाराचे नाव नितेश मल्होत्रा असल्याचे समजले.

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, तिघांपैकी एका आरोपीने मल्होत्राला 'करामती' बल्ब विकत घेण्यासाठी सांगितले.  तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आरोपीने सांगितले की हा बल्ब समृद्धी, भरभराट प्रदान करेल. मल्होत्राला आरोपीच्या हेतूवर शंका आली नाही आणि तो बल्ब त्यांनी 9 लाखात विकत घेतला.  तो  करामती बल्प नसून सामान्य बल्प असल्याचे कळताच नितेश यांची झोपच उडाली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारीच! नवरीची डासू एंट्री पाहून नवऱ्याने नजरच काढली ना राव; पाहा जबरदस्त एंट्रीचा व्हिडीओ

या प्रकरणाचा तपास करत असलेले एसएसपी विजय ढुल यांनी सांगितले की, इरफानवर १२ पेक्षा जास्त फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी, त्याच्यावर एका निष्पाप व्यक्तीची फसवणूक आणि खंडणीखोरी करण्याच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.  याचवर्षी ऑक्टोबरमध्ये दोन लोकांनी मेरठमध्ये लंडनहून परत आलेल्या एका डॉक्टरला अडीच कोटीं रुपयांमध्ये 'अलादीनचा चिराग' विकल्याचा फसवणूकीचा प्रकार समोर आला होता. Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

Web Title: Businessman falls prey to fraud pays rs 9 lakh for karamati bulb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.