खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:48 AM2023-01-31T09:48:11+5:302023-01-31T09:49:33+5:30

Characteristics of Diamond: डायमंड पृथ्वीवर मोजक्याच देशांमध्ये आढळून येतात. या रत्नाबाबत अनेक समज-गैरसमजही लोकांमध्ये असतात. काही लोक सांगतात की, डायमंड किंवा हीरा चाटल्याने कोणत्याही व्यक्तीचा क्षणात मृत्यू होतो.

Can licking a diamond lead to death | खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य

खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य

googlenewsNext

Characteristics of Diamond: डायमंड हा एक असा मूल्यवान पारदर्शी रत्न आहे ज्याच्या आरपार बघता येतं. पृथ्वीवर सापडणारा हा सगळ्यात कठोर पदार्थ असतो म्हणजे त्याला सहजपणे तोडता येत नाही. वैज्ञानिकांनुसार, डायमंड हे कॉर्बनच्या सगळ्यात शुद्ध फॉर्मपासून तयार एक खनिज आहेत. याला कॉर्बनचं ठोस रूप म्हणजे सॉलिड फॉर्मही म्हटलं जातं. याच्या सुंदरतेमुळे आणि कठोरतेमुळे जगभरात याला सगळ्यात जास्त किंमत मिळते.

डायमंड पृथ्वीवर मोजक्याच देशांमध्ये आढळून येतात. या रत्नाबाबत अनेक समज-गैरसमजही लोकांमध्ये असतात. काही लोक सांगतात की, डायमंड किंवा हीरा चाटल्याने कोणत्याही व्यक्तीचा क्षणात मृत्यू होतो. पण यात किती सत्य आहे. तेच आज आपण जाणून घेऊया.

खरंच असं होतं का?

वैज्ञानिकांनुसार, डायमंड चाटल्याने मृत्यू होतो गोष्टीत काहीच तथ्य नाहीये. डायमंडमध्ये असा कोणताही विषारी पदार्थ नसतो. जो कोणत्याही व्यक्तीसाठी मृत्यूचं कारण बनेल. अशात जर कुणी असा दावा करत असेल तर तो साफ चुकीचा आहे. यात काहीच तथ्य नाही.

अनेक लोक म्हणतात की, डायमंड गिळल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. होय, हे खरंय. कारण केवळ डायमंडच नाही तर कोणतीही कठोर वस्तू तुम्ही गिळली तर ती श्वासनलिकेत अडकण्याची भीती असते, ज्यामुळे श्वास न घेता येत असल्याने व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

आता डायमंडला मोजण्याच्या पद्धतीबाबत जाणून घेऊया. डायमंला सोन्यासारखं ग्रॅममध्ये नाही तर कॅरेटमध्ये मोजलं जातं. जेव्हा डायमंड मोजला जातो तेव्हा त्यातील 1 कॅरेटचा अर्थ 200 मिलीग्रॅम आणि 1 पॉइंटचा अर्थ 0.01 कॅरेट असा होतो. याचा सप्लाय कमी आणि डिमांड खूप जास्त असते. त्यामुळे डायमंडला जगात सगळ्यात महागडा धातु म्हटलं जातं.

Web Title: Can licking a diamond lead to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.