जर सापाने स्वत:ला दंश मारला तर मरेल का? जाणून घ्या काय होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 05:08 PM2023-09-19T17:08:55+5:302023-09-19T17:09:29+5:30
साप स्वत:ला दंश मारून आपला जीव घेऊ शकतो का? आज सापाच्या याच गोष्टीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
विषारी सापाने दंश मारला तर व्यक्तीचा जागीच मृत्यू होऊ शकतो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की, जर सापाने स्वत: ला दंश मारला तर काय होईल? साप स्वत:ला दंश मारून आपला जीव घेऊ शकतो का? आज सापाच्या याच गोष्टीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सायन्स एबीसी वेबसाइटनुसार, सापाचं विष त्याच्या सलायवरी ग्लॅंडमध्ये तयार होतं आणि हे विष शिकारला मारण्यासाठी आणि त्याना पचवण्यासाठी मदत करतं. सापाच्या विषात जे महत्वाचं तत्व असतं ते प्रोटीन आहे. या विषात पॉलीपेपटायड्स आहे जे त्याला अधिक घातक बनवतं.
साप दातांचा वापर करून आपल्या शिकारीच्या आत विष टाकतो. काही साप विष स्प्रेसारखंही आपल्या शिकारीवर सोडतात. आता हे जाणून घेऊ की, सापावर त्याच्याच विषाचा काही परिणाम होतो का? तर विषाचा प्रभाव तेव्हाच होतो जेव्हा ते रक्तात मिक्स होतं. कारण त्यातील पॉलीपेपटाइड्स रक्तावरच प्रभाव टाकतील.
विषातील मुख्य तत्व प्रोटीन असतं. प्रोटीन टॉक्सिन तेव्हा प्रभाव करणार जेव्हा ते थेट रक्तात मिक्स होईल. तेव्हाच त्याला शरीरातील टिश्यू अब्सॉर्ब करतील.
जर हेच विष सापाने गिळलं म्हणजे तोंडावाटे थेट पोटात गेलं तर सापाचा मृत्यू होणार नाही. कारण पोटातील केमिकल्स ते पचवतील. जर सापाने स्वत:ला दंश मारला आणि ते विष रक्तात मिक्स झालं तर सापाचा मृत्यू होईल.
विष तसंच काम करेल जर सापाने इतरांना दंश मारल्यावर करतं. सापाच्या डोक्याच्या वर त्याच्या सलाइवा ग्रंथी असतात. ज्याद्वारे विष निघतं. त्यामुळे त्याच्या रक्ताला या विषाची सवय नसते. सोप्या भाषेत सांगायचं तर साप स्वत:ला दंश मारून आपला जीव घेऊ शकतो.