Optical Illusion : केवळ जीनिअस लोकच हे चॅलेंज पूर्ण करू शकतात, 10 सेकंदात शोधा यात काय आहे चूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:56 AM2023-02-16T09:56:51+5:302023-02-16T10:00:19+5:30
Optical Illusion : असाच एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक चूक झाली आहे. ती शोधण्यासाठी लोक तासंतास वेळ घालवत आहेत.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन किंवा वेगवेगळे पझल्स आपल्या मेंदूसोबत खेळ खेळतात. काही फोटो किंवा पझल्समध्ये गोष्टी दाखवल्या जातात ज्या आपले डोळे सहजपणे बघू शकत नाहीत. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक चूक झाली आहे. ती शोधण्यासाठी लोक तासंतास वेळ घालवत आहेत.
डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारं हे चॅलेंज केवळ त्याच लोकांसाठी आहे जे स्वत:ला जीनिअस समजतात. फोटोकडे शांतपणे 10 सेकंद बघायचं आहे त्यातील चूक शोधून काढायची आहे. हे चॅलेंज जे पूर्ण करतील अर्थातच त्यांचा मेंदू इतरांपेक्षा जास्त वेगाने चालतो.
या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये काही नंबर लिहिले आहे. नंबरचे 4-4 चे सेट बनवण्यात आले आहेत. ते नंबर बघून यात तुम्हाला एक चूक शोधून काढायची आहे. या फोटोत एक छोटीशी चूक झाली आहे. पण ती बारकाईने आणि शांतपणे पाहिली तरच तुम्हाला दिसेल. जर तुम्ही 10 सेकंदात चूक शोधू शकत नसाल तर थोडा अधिक वेळ घेऊ शकता
तशी आम्हाला आशा आहे की, जीनिअस लोकांना यातील चूक लगेच दिसली असेल. कारण जीनिअस लोकांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. पण ज्यांनी अजूनही यातील चूक दिसली नसेल तर त्यांच्यासाठी हिंट आहे की, या नंबरांच्या शेवटच्या सेटमध्ये ही चूक झाली आहे.
जर अजूनही तुम्हाला समजलं नसेल या खालच्या फोटोत उत्तर बघू शकता. शेवटच्या नंबरच्या सेटमध्ये एका 0 ऐवजी इंग्रजी अक्षर ओ लिहिलं गेलं आहे. हीच या पझलमधील चूक आहे.