VIDEO : ७ लाख रूपयात खरेदी केलं घर, आत सापडला २ कोटी रूपयांचा 'खजिना'....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 03:56 PM2021-02-04T15:56:19+5:302021-02-04T15:56:38+5:30
ही संपत्ती खरेदी करण्यासाठी तो तयार झाला. तो म्हणाला की, त्याला या गोष्टीचा अंदाजही नव्हता की, त्याला घरात इतका खजिना मिळेल.
कॅनडातील एका एंटीक दुकान मालकाला जेव्हा कळालं की, त्याने खरेदी केलेल्या घराच्या साहित्यात डिझायनर कपडे, दुर्मीळ नाणी, सोन्या-हिऱ्याच्या अंगठ्या, रोख रक्कम आणि चांदीचे डॉलर असलेली बॅग आहे तर तो आनंदाने भारावला. सीबीसी न्यूजनुसार, एलेक्स आर्चबॉल्डचं म्हणणं आहे की, इथे एक मोठा पियानो होता. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी तो तयार झाला. तो म्हणाला की, त्याला या गोष्टीचा अंदाजही नव्हता की, त्याला घरात इतका खजिना मिळेल.
एडमर्टनचं दुकान क्यूरिओसिटी इंकचे मालक मिस्टर आर्चबॉल्डने दिवंगत संगीत शिक्षक बट्टे-जोन आरएसीची संपत्ती १० हजार डॉलरमध्ये म्हणजे ७ लाख रूपयात खरेदी केली होती. आपल्या स्टोरसाठी आर्कबोल्ड नियमितपणे जुन्या घरातील वस्तू खरेदी करतो आणि त्याला सापडलेल्या वस्तू YouTube वर व्हिडीओतून दाखवतो. (हे पण वाचा : बाबो! 'या' रॅपरने कपाळावर लावला १७५ कोटी रूपयांचा हिरा, लोक म्हणाले - 'देवाने तुझं डोकं वाचवावं')
तो म्हणाला की,, 'पियानो आणि इतर वस्तू बघून मी घर १० हजार डॉलरला खरेदी केलं होतं. पण जेव्हा मी आत गेलो तेव्हा हैराण झालो. इतकं किंमती सामान असण्याची मला अपेक्षा नव्हती'.
आर्चबोल्ड म्हणाला की, तो संगीत शिक्षकांना अनेक वर्षांपासून ओळखत होता. पण कधीही त्यांच्या घरात गेला नव्हता. घराची चावी मिळाली तेव्हा त्याला समजलं की, या घरात अनेक मूल्यवान वस्तू आहेत. त्याने उब पांडाला सांगितले की, 'घरात भरपूर साहित्य जमा करण्यात आलं होतं. मला माहीत नव्हतं की, मी ज्या शिक्षकाला भेटलो होतो तो मिलेनिअर होता'. (हे पण वाचा : काय सांगता? १८० वर्ष जगण्यासाठी हा माणूस करतोय भलताच जुगाड; आतापर्यंत खर्च केले इतके पैसै)
यातील सर्वात यादगार शोध म्हणजे एका गादीखाली त्याला चांदीची एक पट्टी मिळाली. आर्चबोल्ड आणि त्याच्या टीमला अनेक वस्तू सापडल्या. १९२० काळातील अनेक नाणी आणि अनेक ट्रिंकेटही होते. या एंटीक डीलरचा अंदाज आहे की, या सर्व वस्तू जवळपास ४००,००० डॉलर म्हणजे साधारण २ कोटी रूपयांना त्याला खजिना मिळालाय.