महिलेच्या बेडवर छत तोडून आकाशातून पडलं असं काही, उठून पाहिलं तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:48 AM2021-10-11T11:48:49+5:302021-10-11T11:53:05+5:30

पृथ्वीपासून स्पेसचं अंतर १०० किलोमीटर आहे. इतक्या उंचीवरून माझ्या डोक्यावर दगड पडला असता तर माझा जीव गेला असता.

Canada : Meteor crashes from space on to Woman's bed inches from her head | महिलेच्या बेडवर छत तोडून आकाशातून पडलं असं काही, उठून पाहिलं तर...

महिलेच्या बेडवर छत तोडून आकाशातून पडलं असं काही, उठून पाहिलं तर...

Next

कॅनडातील ब्रिटीश कोलंबियामधून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक महिला रात्री गाढ झोपेत असताना अंतराळातून एक मोठा दगड येऊन पडला. हा दगड महिलेच्या बेडरूमचं छत तोडून थेट बेडवर येऊन पडला. या धक्कादायक घटनेत महिलेचा जीव थोडक्यात वाचला.

डेली स्टारमद्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, महिलेचं नाव रूथ हॅमिल्टन आहे. हा दगड अंतराळातून महिलेच्या बेडवर तिच्या डोक्याच्या काही अंतरावरच पडला. जेव्हा हा दगड बेडवर पडला तेव्हा मोठा आवाज झाला आणि तेव्हा ती खूप घाबरली. महिलेनं सांगितलं की देवानेच तिचा जीव वाचवला, नाहीतर आज ती जिवंत राहिली नसती. पृथ्वीपासून स्पेसचं अंतर १०० किलोमीटर आहे. इतक्या उंचीवरून माझ्या डोक्यावर दगड पडला असता तर माझा जीव गेला असता.

महिलेने सांगितलं की, ही घटना रात्री घडली होती. त्यावेळी ती बेडवर झोपली होती. धमाक्याचा आवाज ऐकून ते घाबरून उठली आणि बघितलं की, बेडवर एक मोठा दगड पडला होता. बेडरूमच्या छताला छिद्र पडलं होतं.

रूथ हॅमिल्टन म्हणाली की, या घटनेनंतर तिने पोलिसांना फोन केला. कारण सुरूवातीला तर तिला काही समजलंच नाही की, हा दगड स्पेसमधून तिच्या बेडवर पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी महिलेच्या घराजवळ एका कन्स्ट्रक्शन साइटची तपासणी केली. पण पोलिसांना काही पुरावा मिळाला नाही. 

नंतर तपासातून समोर आलं की, हा दगड स्पेसमधून महिलेच्या बेडरूममध्ये पडला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशी घटना आधी कधी पाहिली नाही. दिलासादायक बाब ही आहे की, महिलेचा जीव वाचला. तिला काही जखमही झाली नाही.
 

Web Title: Canada : Meteor crashes from space on to Woman's bed inches from her head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.