ऐकावं ते नवलंच! चक्क साबणाच्या मदतीने 220 टन वजनी इमारत हलवली, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 04:08 PM2023-12-12T16:08:23+5:302023-12-12T16:09:47+5:30

कॅनडाच्या नोव्हा स्कॉशियात ही अजब घटना घडली आहे.

canada-trending-news-220-ton-building-shifted-using-700-bars-of-soap-in-nova-scotia-canada-see-video | ऐकावं ते नवलंच! चक्क साबणाच्या मदतीने 220 टन वजनी इमारत हलवली, पाहा Video...

ऐकावं ते नवलंच! चक्क साबणाच्या मदतीने 220 टन वजनी इमारत हलवली, पाहा Video...

Strange News: अवाढव्य इमारती एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर हलवल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. परदेशाप्रमाणे भारतातही अनेक ठिकाणी चक्क इमारती दुसऱ्या ठिकाणी हलवल्याच्या घटना घडल्या आहेत. पम, कॅनडातील नोव्हा स्कॉशियामधून एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चक्क साबणाच्या मदतीने तब्बल 220 टन वजनी इमारत दुसरीकडे हलवण्यात आली आहे. इमारतीच्या स्थलांतराचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

कॅनडातील हॅलिफॅक्समधील ही इमारत 1826 मध्ये बांधण्यात आली होती. कालांतराने या इमारतीचे व्हिक्टोरियन एल्मवुड हॉटेलमध्ये रूपांतर झाले. आता ही जुनी इमारत पाडण्याचा निर्मय घेण्यात आला होता. पण, पण रिअल इस्टेट कंपनी गॅलेक्सी प्रॉपर्टीजने ही इमारत नवीन ठिकाणी हलवण्याची योजना आखली. कंपनीने ज्या पद्धतीने संपूर्ण इमारत हलवली, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे.

पाहा व्हिडिओ:-

700 साबणाचा वापर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एस रश्टन कन्स्ट्रक्शन फर्मच्या टीमने सुमारे 700 साबणाच्या मदतीने हे हॉटेल नवीन ठिकाणी हलवले. कंपनीचे मालक शेल्डन रश्टन यांनी सांगितले की, रोलर्स वापरण्याऐवजी त्यांनी रोलरच्या आकाराचे साबण वापरले. साबण अतिशय मऊ होते, ज्यामुळे इमारत सरकवण्यास मोठी मदत झाली.

इमारत 30 फूट अंतरावर हलवली
बांधकाम कंपनीने फेसबुकवर इमारतीच्या स्थलांतराचा टाइमलॅप व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हॉटेल साबणाच्या मदतीने 30 फूट दूर हलवले जात असल्याचे दाखवले आहे. आता लवकरच या इमारतीला पूर्वीप्रमाणे केले जाणार आहे.

 

Web Title: canada-trending-news-220-ton-building-shifted-using-700-bars-of-soap-in-nova-scotia-canada-see-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.