अकाऊंटमध्ये शिल्लक १३१ रूपयांची महिलेने काढली लॉटरी, पुढे जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 05:00 PM2019-08-27T17:00:26+5:302019-08-27T17:02:58+5:30

'ऊपर वाला जब भी देता, देता छप्पड़ फाड़ के' ही हिंदीतील म्हण या महिलेसाठी परफेक्ट लागू पडते.

Canada woman set for life after winning a big lottery jackpot | अकाऊंटमध्ये शिल्लक १३१ रूपयांची महिलेने काढली लॉटरी, पुढे जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

अकाऊंटमध्ये शिल्लक १३१ रूपयांची महिलेने काढली लॉटरी, पुढे जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

(Image Credit : Social Media) (प्रतिकात्मक फोटो)

'ऊपर वाला जब भी देता, देता छप्पड़ फाड़ के' ही हिंदीतील म्हण कॅनडातील विक्की मिशेल या महिलेला परफेक्ट लागू पडते. तुम्ही म्हणाल कशी? तर या महिलेने केवळ १३१ रूपयांची लॉटरी खरेदी केली होती आणि तिला ३१ कोटी रूपयांची लॉटरी लागली. आता या महिलेच्या आनंदाला पारावार नाहीयेत.

४२ वर्षीय मिशेल दोन मुलांची आई आहे आणि हॉलीफॅक्समध्ये राहते. एका अकाउंटन्सी कंपनीत  काम करते. या महिलेने सांगितले की, जेव्हा तिने ही लॉटरी खरेदी केली तेव्हा तिच्या अकाऊंटमध्ये केवळ दीड पाउंड म्हणजेच १३१ रूपयेच शिल्लक राहिले होते आणि आता याच १३१ रूपयांनी तिचं नशीब बदलून गेलं आहे.

(Image Credit : english.newstracklive.com)

या महिलेने पुढे सांगितले की, ती नेहमी लॉटरीची तिकीट खरेदी करत होती. याआधी तिने १० पाउंड म्हणजेच साधारण ८७८ रूपये जिंकले होते. या पैशातून तिने पुन्हा लॉटरी खरेदी केली. त्यातून ती केवळ पाच पाउंड म्हणजे साधारण ४३९ रूपयेच जिंकू शकली. या पैशांनी सुद्धा तिने आणखी लॉटरीची तिकीटे खरेदी केली.

१९ ऑगस्टला मिशेलच्या अकाऊंटमध्ये केवळ दीड पाउंड म्हणजेच साधारण १३१ रूपयेच शिल्लक होते आणि तिने पुन्हा लॉटरी काढली. यावेळी तिच्या नशीबाने तिला साध दिली आणि ती ३६ लाख पाउंड म्हणजे ३१ कोटी ५५ लाखांची लॉटरी जिंकली. आता ही रक्कम तिला हप्त्यांमध्ये मिळणार आहे. ही रक्कम तिला ३० वर्षे दर महिन्याला आठ लाख ८० रूपये अशी मिळणार आहे.

मिशेलनुसार, जेव्हा तिला लॉटरी कंपनीचा मेल आता तेव्हा तिला वाटले की, तिने एखादी छोटी रक्कम जिंकली असावी. पण जेव्हा तिने अकाऊंटमध्ये पाहिलं तर ती थक्क झाली. मिशेलने याबाबत पतीला सांगितते तर त्यालाही विश्वास बसला नाही.

Web Title: Canada woman set for life after winning a big lottery jackpot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.