रातोरात बदललं नशीब! १८ व्या वाढदिवशी मुलगी बनली ५ मर्सिडिज कार, १ बंगला अन् १ चार्टर्ड प्लेनची मालकीन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 07:07 PM2023-02-07T19:07:48+5:302023-02-07T19:08:07+5:30

तिने तिच्या वडिलांच्या मदतीने पैसे गुंतवण्याची योजना आखली होती. यामुळे तिला तिचा अभ्यास सुरू ठेवता येईल अन् शेवटी डॉक्टर बनता येईल.

Canadian Woman Wins Rs 290 Crore in Lottery, Buys 5 Mercedes And A Plane | रातोरात बदललं नशीब! १८ व्या वाढदिवशी मुलगी बनली ५ मर्सिडिज कार, १ बंगला अन् १ चार्टर्ड प्लेनची मालकीन

रातोरात बदललं नशीब! १८ व्या वाढदिवशी मुलगी बनली ५ मर्सिडिज कार, १ बंगला अन् १ चार्टर्ड प्लेनची मालकीन

Next

कॅनडातील ओंटारियो येथे राहणाऱ्या ज्युलिएट लॅमोर नावाच्या मुलीचं १८व्या वाढदिवसाला आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मुलीने ७ जानेवारीला तिचा वाढदिवस साजरा केला. ज्युलिएट तिच्या खास  वाढदिवसासाठी काहीतरी खरेदी करण्यासाठी सुपरस्टोअरला भेट देते. पण यंदा काय खरेदी करावं हे तिला समजत नव्हतं. तेव्हा आजोबांनी तिला लॉटरीची तिकिटे घेण्याचा सल्ला दिला. ही तिकिटे कशी खरेदी करायची हे ज्युलिएटला कळत नव्हते. त्यामुळे तिने वडिलांना फोन करून चौकशी केली. मग ती ओंटारियो लॉटरी आणि गेमिंग कॉर्पोरेशनमध्ये गेली आणि लॉटरीचे तिकीट विकत घेतले. तिने लोट्टो ६-४९ लॉटरी खरेदी करून घरी परतली.

४८ मिलियन कॅनेडियन डॉलर जिंकले
यानंतर ज्युलियन या लॉटरीच्या तिकिटाचा विसर पडला. अचानक एके दिवशी तिला कळले की तिच्या शेजाऱ्याने ७ जानेवारीला लॉटरीत बक्षीस जिंकले आहे. तेव्हा आपणही तिकीट घेतल्याचं तिला आठवणीत आले. तिने पटकन जाऊन मोबाईल अॅपवर लॉटरीचे अपडेट चेक केले. तेव्हा तिला सुखद धक्का बसला. तिने ४८ मिलियन कॅनेडियन डॉलर्स (2,95,65,86,034.24 रुपये) जिंकले आहेत.

गंमत म्हणजे ती तिच्या ऑफिसमध्ये असताना तिकीट तपासली. तिला लॉटरी लागल्याचं कळताच  अनेक सहकाऱ्यांनीही आश्चर्य वाटले. तिला ऑफिसने लवकर घरी निघून जाण्याचा सल्ला दिला, परंतु त्याच्या आईने शिफ्ट संपल्यानंतरच घरी परतण्यास सांगितले.

२ अब्ज ९५ लाख केले खर्च
यानंतर ज्युलिएटचे आयुष्यच बदलून गेले. तिने आपल्या कुटुंबासाठी पाच सर्वात महागड्या मर्सिडीज कार, एक चार्टर विमान आणि लंडनमध्ये एक बंगला खरेदी केला. त्यासह भविष्यासाठी १५० कोटी रुपये वाचवले. टॉप-ऑफ-द-लाइन मर्सिडीजची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे, तर मध्यम आकाराच्या चार्टर विमानाची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. ज्युलिएटनेही बंगल्यावर ४० कोटी रुपये खर्च केले.

ज्युलिएटने ग्लोबल न्यूजला सांगितले की, तिने तिच्या वडिलांच्या मदतीने पैसे गुंतवण्याची योजना आखली होती. यामुळे तिला तिचा अभ्यास सुरू ठेवता येईल अन् शेवटी डॉक्टर बनता येईल. यानंतर ती आपल्या कुटुंबासह जगभ्रमंती करण्याचा विचार करत आहे. पृथ्वीवरील प्रत्येक देशाची भाषा, खाद्यपदार्थ आणि जीवनशैली जाणून घेण्यासाठी ती उत्सुक आहे. मुलीला नेहमीच डॉक्टर बनण्याची इच्छा होती, परंतु तिच्याकडे पैसे नव्हते. आता त्यांना पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याची गरज भासणार नाही असं ज्युलिएटच्या वडिलांनी म्हटलं. 
 

Web Title: Canadian Woman Wins Rs 290 Crore in Lottery, Buys 5 Mercedes And A Plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.