नशीबवान! पतीने स्वप्नात पाहिलेल्या नंबरची लॉटरी घेऊन महिला झाली मालामाल, रक्कम वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 09:31 AM2021-01-25T09:31:08+5:302021-01-25T09:34:29+5:30

कॅनडात राहणाऱ्या डेंग प्रवातोडोम नावाच्या महिलेच्या पतीने एक स्वप्न पाहिलं होतं आणि या स्वप्नामुळे दोघांचंही नशीब बदलून गेलं.

Canadian woman wins Rs 344 crores in lottery said she got the winning numbers from her husband dream | नशीबवान! पतीने स्वप्नात पाहिलेल्या नंबरची लॉटरी घेऊन महिला झाली मालामाल, रक्कम वाचून व्हाल अवाक्....

नशीबवान! पतीने स्वप्नात पाहिलेल्या नंबरची लॉटरी घेऊन महिला झाली मालामाल, रक्कम वाचून व्हाल अवाक्....

Next

झोपेत स्वप्न बघणं सामान्य बाब आहे. पण जेव्हा काही चांगली स्वप्ने सत्यात उतरतात तेव्हा व्यक्तीच्या आनंदाला सीमा नसते. अशीच एक घटना कॅनडातून समोर आली आहे. कॅनडात राहणाऱ्या डेंग प्रवातोडोम नावाच्या महिलेच्या पतीने एक स्वप्न पाहिलं होतं आणि या स्वप्नामुळे दोघांचंही नशीब बदलून गेलं.

टोरांटोची राहणारी डेंग प्रवातोडोम या महिलेच्या पतीने स्वप्नात एक नंबर पाहिला होता. त्याच नंबरची एक लॉटरी डेंग यांनी खरेदी केली. ही लॉटरी त्या जिंकल्या असून यातून त्या मालामाल झाल्या आहेत. ओंटोरियो लॉटरी आणि गेमिंग कॉर्पोरेशननुसार, डेंग प्रवातोडोम यांनी १ डिंसेबर २०२० ला स्वप्नात पाहिलेल्या नंबरचा वापर करून एक लॉटरी खरेदी केली होती. ज्यातून त्या ६ कोटी कॅनेडिअन डॉलर म्हणजे ३४४ कोटी रूपये जिंकल्या आहेत.

डेंग प्रवातोडोम यांनी सांगितले की, त्यांच्या पतीने दोन दशकांआधी काही नंबर्सबाबत एक स्वप्न पाहिलं होतं आणि जॅकपॉट जिंकण्यासाठी तेव्हापासून त्या त्यांच नंबरच्या लॉटरी खरेदी करत होत्या.

ओंटोरियो लॉटरी आणि गेमिंग कॉर्पोरेशननुसार, कोरोना काळात डेंग प्रवातोडोम म्हणाल्या की, 'मी आणि माझे पती गेल्या ४० वर्षांपासून एक सामान्य मजूर म्हणून काम करत आहोत. पण खूप मेहनत करूनही काही पैसे बचत करू शकत नव्हतो. कोरोना काळात स्थिती फार वाईट झाली होती. आमची नोकरी गेली होती. आता या लॉटरीच्या पैशातून मदत होईल'.

डेंग प्रावाताडोम यांनी सांगितले की, हे लॉटरीचे पैसे मिळाल्यावर त्यांचं दोघांचं आयुष्य सूखकर होईल. त्या म्हणाल्या की, ते या पैशातून लेकराचं शिक्षण करतील. सोबतच गाडी आणि घर खरेदी करतील.
 

Web Title: Canadian woman wins Rs 344 crores in lottery said she got the winning numbers from her husband dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.