आता जेवणाची ऑर्डर कॅन्सल केल्यास थेट ६ वर्ष तुरूंगवास; वाचा दंडाची रक्कम किती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:24 PM2020-06-09T12:24:36+5:302020-06-09T12:36:43+5:30
म्हाला कल्पना असेल काही जण मुद्दाम जेवणाची ऑर्डर करून काही वेळातच कॅन्सल करतात. त्यामुळे ऑर्डर तयार करत असेलल्यांना तसंच डिलिव्हरी करत असलेल्या लोकांना त्रासाचा सामना करावा लागतो.
सध्याच्या जीवनशैली बाहेरून जेवणं मागवणं हा रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. स्विगी, झोमॅटो असे अनेक वेगवेगळे ऑपशन्स आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपल्याला काही वेगळं खावसं वाटलं किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आला तेव्हाआपण असं काहीतरी ऑर्डर करतो. तुम्हाला कल्पना असेल काही जण मुद्दाम जेवणाची ऑर्डर करून काही वेळातच कॅन्सल करतात. त्यामुळे ऑर्डर तयार करत असलेल्या लोकांना तसंच डिलिव्हरी असलेल्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. पण अशा लोकांसाठी फिलिपीन्समध्ये एक मोठा नियम करण्यात आला आहे.
फिलीपीन्समध्ये मुद्दाम जेवण ऑर्डर करून रद्द करत असलेल्या व्यक्तीला जवळपास ६ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे. ४ जूनला फिलीपीन्समधील प्रातिनिधिक सभेत हा निर्णय झाला. या नियामानुसार दोषी व्यक्तीला १ ते दीड लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या माहामारीत ऑनलाईन जेवण मागवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
पण काही ग्राहक खाद्यपदार्थ स्विकारण्याआधीच ऑर्डर रद्द करतात त्यामुळे डिलिव्हरी करत असलेल्या व्यक्तींना गरज नसताना त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे. एकेओ बीकोल पक्षाचे प्रतिनिधी अल्फ्रेडो गार्बिन यांनी सांगितले की, या नियमांमुळे उगाच ऑर्डर करण्याच्या प्रकाराला आळा बसेल आणि बाईकने डिलिव्हरी करत असलेल्या लोकांची गैरसोय टळेल.
जगातील सगळ्यात मौल्यवान लाकडांबाबत माहित्येय का? चंदनाच्या लाकडापेक्षाही १० पटीने महाग...
बापरे! काय सांगता, ‘या’ गावातील लोक करतायेत सापांची शेती; जगभरात गाजतंय गावाचं नाव!