Cancer Patient Job Interview: कँसरग्रस्त रुग्णाने उपचारादरम्यान दिली मुलाखत, महाराष्ट्रीयन CEO ने दिली थेट नोकरीची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:15 AM2022-04-28T11:15:26+5:302022-04-28T11:15:36+5:30

Cancer patient gave job interview: एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा केमोथेरपी दरम्यान नोकरीसाठी मुलाखत देतानाचा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

Cancer patient gave job interview during chemotherapy, photo goes viral | Cancer Patient Job Interview: कँसरग्रस्त रुग्णाने उपचारादरम्यान दिली मुलाखत, महाराष्ट्रीयन CEO ने दिली थेट नोकरीची ऑफर

Cancer Patient Job Interview: कँसरग्रस्त रुग्णाने उपचारादरम्यान दिली मुलाखत, महाराष्ट्रीयन CEO ने दिली थेट नोकरीची ऑफर

googlenewsNext

Cancer Patient Intervie: एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा केमोथेरपीदरम्यान नोकरीसाठी मुलाखत देतानाचा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या फोटोने हजारो नेटिझन्सना प्रेरित केले आहे. लिंक्डइनवर #OpenToWork बॅज लावणाऱ्या अर्श नंदन प्रसादने(Arsh Nandan Prasad) आजारपणामुळे नोकरी न मिळण्याची धडपड शेअर केली. तसेच, त्याला सहानुभूतीची गरज नसून स्वत:ला सिद्ध करायचे आहे, असे तो म्हणाला.

केमोथेरपी दरम्यान दिली मुलाखत 
अर्श नंदनने त्याच्या केमोथेरपीदरम्यान हॉस्पिटलच्या बेडवर बसून मुलाखत देत असल्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत अर्शने लिहिले की, 'जेव्हा तुम्ही मुलाखतीत तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करता, पण कठीण परिस्थितीतून जात असल्यामुळे तुमची निवड केली जात नाही. कंपन्या किती उदार आहेत हे आयुष्य नक्कीच दाखवते. मी कॅन्सरशी लढत असल्याचे रिक्रूटर्सना समजताच त्यांच्या बोलण्यात बदल झालेला दिसतो. पण, मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी येथे आलो आहे.'

अर्शची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल 
अर्शची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टला 94,000 हून अधिक लाईक्स आणि 3,500 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. नेटिझन्स अर्शच्या धैर्याने आणि लढण्याच्या भावनेने प्रेरित आहेत. एका यूजरने म्हटले की, 'ही फायटिंग स्पिरिट आहे. तुला सलाम.' दुसर्‍याने लिहिले की, 'मी प्रार्थना करतो की तुम्ही लवकर बरे व्हाल. मला तुमच्या जिद्दीचे कौतुक वाटते.' 

महाराष्ट्रीयन CEOने दिली नोकरीची ऑफर
या पोस्टने महाराष्ट्रस्थित टेक कंपनी अप्लाइड क्लाउड कॉम्प्युटिंगचे सीईओ निलेश सातपुते यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी अर्शला हवे तेव्हा कंपनीत सामील होण्याची ऑफर दिली आहे. निलेश सातपुते अर्शला म्हणाले, 'हॅलो अर्श! तू खरोखर योद्धा आहेस. उपचारादरम्यान मुलाखतीला उपस्थित राहणे थांबव. मी तुझी सर्व कागदपत्रे पाहिली आहेत. तुला पाहिजे तेव्हा तू आमच्या कंपनीत सामील होऊ शकतोस. तुझी मुलाखत होणार नाही.'

Web Title: Cancer patient gave job interview during chemotherapy, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.