जगातला एक असा सायको किलर, ज्याला हत्या केल्यावर होती प्रायवेट पार्ट खाण्याची आवड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 10:04 AM2022-11-17T10:04:52+5:302022-11-17T10:05:13+5:30
Armin Meiwes: आर्मिन मेवाइज या सगळ्यात खतरनाक सायको किलरपैकी एक मानलं जातं. आर्मिन मेवाइजने एका व्यक्तीला घरी बोलवलं, त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा प्रायवेट पार्ट शिजवून खाल्ला.
Armin Meiwes: श्रद्धा मर्डर केसबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी आफताबने ज्याप्रकारे श्रद्धाची हत्या केली आणि पुरावे मिटवण्यासाठी जे केलं ते वाचून सगळेच हैराण झाले आहेत. त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि रोज एक तुकडा तो फेकत होता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सायको किलरची कहाणी सांगणार आहोत. या सायको किलरने एका व्यक्तीला घरी बोलवलं, त्याची हत्या केली आणि मग त्याचा प्राइवेट पार्ट शिजवून खाल्ला. इतकंच नाही तर याचा त्याने व्हिडीओही बनवला. ही व्यक्ती जर्मनीच्या रॉटेनबर्गमध्ये राहत होती. त्याचं नाव आर्मिन मेवाइज होतं आणि तो एक कॉम्प्युटर टेक्नीशिअन होता.
आर्मिन मेवाइज या सगळ्यात खतरनाक सायको किलरपैकी एक मानलं जातं. आर्मिन मेवाइजने एका व्यक्तीला घरी बोलवलं, त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा प्रायवेट पार्ट शिजवून खाल्ला. ही घटना 2001 मधील आहे. त्याने बर्नाड ब्रांडेसची हत्या तर केलीच सोबतच त्याचा प्रायवेट पार्ट खाल्ला आणि त्यानंतर याचा व्हिडीओ आपल्या वेबसाइटवर अपलोडही केला.
यानंतर आर्मिनला 2002 साली अटक करण्यात आली आणि त्याला 2004 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. आता त्याची शिक्षा संपली आहे. आर्मिन म्हणाला की, ज्या व्यक्तीला त्याने खाल्लं होतं त्याने स्वत: वॉलेंटिअर म्हणून मला संपर्क केला होता. तो हेही म्हणाला होता की, जर्मनीत जवळपास 800 लोक असे आहेत जे मानवी मांस खाण्यासारखं अजब काम करतात. आर्मिननुसार, त्याने त्याच्या वेबसाइटवर एक जाहिरात दिली होती ज्यानंतर बर्नाड ब्रांडेसने त्याला संपर्क केला होता. तो म्हणाला होता की, या लोकांना कॅनिबलिज्मच्या माध्यमातून जगातील काळ्या शक्तींसोबत संबंध स्थापित करायचा आहे.
आर्मिनने कोर्टात हे कबूल केलं होतं की, फार कमी वयापासूनच तो मानवी मांस खाण्याचं स्वप्न बघत होता. तो म्हणाला की, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर मी माझं एक बाथरूम स्लॉटर हाऊस केलं होतं. आर्मिनने केवळ ब्रांडेसला मारलं नाही तर 10 महिने त्याचं मांस एका फ्रीजरमध्ये ठेवलं आणि रोज ते खात होता.