झोप लागत नाही? आर्मीची ही ट्रिक आजमावल्यास २ मिनिटांत झोप येईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:22 AM2021-02-01T09:22:11+5:302021-02-01T09:23:02+5:30

American Army trick: लष्कराचे जवान ही ट्रीक वापरून दोन मिनिटांत झोपी जातात. विश्वास बसत नसेल तर ही ट्रीक एकदा ट्राय करून पहा. न जाणो तुम्हाला झोप लागली तर. 

Can't sleep? If you try this army trick, you will fall asleep in 2 minutes... | झोप लागत नाही? आर्मीची ही ट्रिक आजमावल्यास २ मिनिटांत झोप येईल...

झोप लागत नाही? आर्मीची ही ट्रिक आजमावल्यास २ मिनिटांत झोप येईल...

googlenewsNext

अनेकांना चिंता किंवा कसले विचार मनाच नसले तरीही रात्र रात्रभर झोप लागत नाही. मध्यरात्री २-३ वाजेपर्यंत झोप लागण्याची वाट पाहत असतात. या कुशीवरून त्या कुशीवर वळत असतात. अशाने शेजारी झोपलेल्यांचीही झोपमोड होते ती वेगळीच. झोप येत नाही म्हणून मोबाईलमध्ये डोकावून असतात. झोप येण्यासाठी अनेकजण काय काय करत नाहीत. उलटे आकडे मोजणे, पावसाचा आवाज ऐकणे आदी अनेक उपाय करतात. तरीही झोप येत नाही. अशावेळी आर्मीची ट्रीक कामी येईल. 


लष्कराचे जवान ही ट्रीक वापरून दोन मिनिटांत झोपी जातात. विश्वास बसत नसेल तर ही ट्रीक एकदा ट्राय करून पहा. न जाणो तुम्हाला झोप लागली तर. 


एका पुस्तकामध्ये या ट्रीकचा उल्लेख आहे. या पुस्तकाचे नाव आहे ‘रिलॅक्स अँड विन : चॅम्पियनशिप परफॉर्मन्स’. यामध्ये अमेरिकी सैन्याच्या अनेक गुप्त गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या मध्ये कोणीही 120 सेकंदांत झोपी जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. हे पुस्तक 1981 मध्ये प्रकाशित झाले होते. सध्या हे पुस्तक ऑनलाईन पल्बिश करण्यात आले आहे. 


2011 मध्ये केलेल्या एका सर्व्हेमध्ये असे समोर आले की, ब्रिटनचा प्रत्येक तिसरा नागरिक झोप येत नसल्याने त्रस्त आहे. याचे कारण चिंता, डिप्रेशन, निकोटिन आणि अल्कोहोल आहे. जे झोपेला खराब करण्याचे काम करते. ‘एनएचएस’ नुसार प्रत्येक व्यक्तीच्या झोपेची गरज ही वेगवेगळी आहे. वरिष्ठांना 7 ते 8 तासांची झोप हवी असते. जर झोप योग्य वेळ झाली नाही तर डायबिटीस, हृदयरोग आणि स्ट्रोकसारखे आजार सुरु होतात. 

झोपेची ट्रीक कोणती...
चेहऱ्यावरील मसल्ससोबत जीभ, जबडा आणि डोळ्यांना रिलॅक्स करावे. खांदे देखील एकदम ढीले सोडावेत. त्यांना खालच्या बाजुने झुकू द्यावे. एवढे केल्यानंतर श्वास सोडावा. छातीला व पायांना रिलॅक्स करावे. एकदा का तुम्ही तुमचे शरीर 10 सेकंदांसाठी रिलॅक्स सोडलात की मनातील विचार काढून टाका. विचार करणे बंद करा. पुस्तकामध्ये याचा प्रकार सांगण्यात आला आहे. तुमच्या डोक्यावर निळे आकाश आहे आणि समोर शांत धबधबा. किंवा 10 सेकंद विचार नको, विचार नको असे शब्द मनातले मनात पुटपुटा. असे केल्याने झोप येऊ शकते. प्रयत्नांती परमेश्वर. 

Web Title: Can't sleep? If you try this army trick, you will fall asleep in 2 minutes...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य