कधी ग्रॅज्युएट मांजर पाहिलंय का? मालकीणीसोबत हजेरी लावली लेक्चरना अन् मिळवली डिग्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:44 PM2022-06-07T19:44:25+5:302022-06-07T19:51:20+5:30

अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणारं सूकी नावाचं एक पाळीव मांजर फक्त हुशारच नाही, तर चक्क ग्रॅज्युएट आहे, असं गमतीने म्हणायला हरकत नाही. ग्रॅज्युएशन कोट आणि हॅट घातलेलं (Pet Cat wearing Graduation dress) हे मांजर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

cat graduates from university after attending zoom lecture with his owner | कधी ग्रॅज्युएट मांजर पाहिलंय का? मालकीणीसोबत हजेरी लावली लेक्चरना अन् मिळवली डिग्री

कधी ग्रॅज्युएट मांजर पाहिलंय का? मालकीणीसोबत हजेरी लावली लेक्चरना अन् मिळवली डिग्री

googlenewsNext

तुम्ही आतापर्यंत किती तरी हुशार असे पाळीव प्राणी (Clever Pets) पाहिले असतील. काही आपल्या मालकाने सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकतात, तर काही प्राणी स्वतःच कित्येक गोष्टी करू शकतात. बोलणारे पोपट तर तुम्ही कित्येक व्हिडिओजमध्ये किंवा प्रत्यक्षातही पाहिले असतील; मात्र तुम्ही कधी ग्रॅज्युएट मांजर (Graduate Cat) पाहिलं आहे का? अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणारं सूकी नावाचं एक पाळीव मांजर फक्त हुशारच नाही, तर चक्क ग्रॅज्युएट आहे, असं गमतीने म्हणायला हरकत नाही. ग्रॅज्युएशन कोट आणि हॅट घातलेलं (Pet Cat wearing Graduation dress) हे मांजर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये (University of Texas) शिक्षण घेत असलेल्या फ्रांसिस्का बॉर्डिअर (Francesca Bourdier) या विद्यार्थिनीचं हे मांजर आहे. हे मांजर नेहमीच फ्रान्सिस्कासोबत असतं. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे जगभरातल्या जवळपास सर्वच विद्यापीठांनी ऑनलाइन लेक्चर्सचा पर्याय स्वीकारला होता. या काळात फ्रांसिस्कादेखील आपल्या लॅपटॉपच्या साह्याने ऑनलाइन लेक्चर्सना उपस्थित राहत होती. या लेक्चर्सदरम्यान सूकीदेखील पूर्ण वेळ फ्रांसिस्कासोबतच असायची. एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणेच सूकीदेखील पूर्ण वेळ लेक्चरला (Cat attended online lectures) बसून असायची. 'फॉक्स न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पदवीदान समारंभाला मांजराची उपस्थिती
फ्रांसिस्काने सांगितले, की सूकी तिच्यासोबत प्रत्येक लेक्चरला उपस्थित असायची. लेक्चरसाठी लॅपटॉप उघडताच ती घरात कुठेही असली, तरी येऊन लॅपटॉपसमोर बसायची. एखादी विद्यार्थिनी असल्याप्रमाणे ती संपूर्ण लेक्चर मन (Pet Cat attends online lectures with owner) लावून ऐकायची. त्यामुळेच पदवीदान समारंभालादेखील फ्रान्सिस्का आपल्या मांजराला घेऊन गेली.

ग्रॅज्युएशन ड्रेसमधले फोटोज व्हायरल
पदवीदान समारंभाला जाण्यासाठी फ्रान्सिस्काने स्वतःसोबतच आपल्या मांजरासाठीही एक ग्रॅज्युएशन ड्रेस (Pet Cat wearing graduation dress) शिवला होता. सूकीचा ग्रॅज्युएशन ड्रेसही इतर विद्यार्थ्यांच्या ड्रेसप्रमाणेच होता. ग्रॅज्युएशन गाउन आणि कॅपमधले फ्रान्सिस्का आणि सूकीचे फोटो (Cat and owner Graduate from university) सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

खरोखर डिग्री मिळालेली नाही
अर्थात, विद्यापीठाने खरोखरच सूकीला कोणतीही डिग्री दिली नाहीये; मात्र पदवीदान समारंभात ग्रॅज्युएशन ड्रेसमध्ये स्टेजवर जाण्याची संधी मात्र सूकीला नक्कीच मिळाली. त्यामुळेच नेटकरी आता सूकीला ‘ग्रॅज्युएट मांजर’ (Graduate Cat viral images) म्हणत आहेत. ज्या पद्धतीने तिने सर्व लेक्चरना उपस्थिती लावली, तेच पुरेसं असल्याचं अनेक सोशल मीडिया युझर्सनी म्हटलं आहे. सूकीची ही स्टोरी आणि फ्रान्सिस्कासोबतचे तिचे ग्रॅज्युएशन कॅप घातलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत. सर्वांनाच या पदवीधर मांजराची स्टोरी खूप आवडत आहे.

Web Title: cat graduates from university after attending zoom lecture with his owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.