मांजरीच्या चुकीमुळे घरात लागली आग, लाखो रूपयांचं झालं नुकसान...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:43 AM2024-04-30T10:43:06+5:302024-04-30T10:44:38+5:30
मांजरीच्या मालकाला 4 एप्रिलला त्याच्या प्रॉपर्टी मॅनेजमेंट स्टाफकडून फोन आला. ज्यात त्यांनी सांगितलं तुमच्या घरात आग लागली आहे.
चीनमध्ये एका मांजरीने चुकीने आपल्या मालकाच्या किचनमधील इंडक्शन कुकर सुरू केला. ज्यामुळे घरात आग लागली. या आगीमुळे 100,000 युआन म्हणजे 11,67,641 रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालं. South China Morning Post च्या रिपोर्टनुसार, मांजरीच्या मालकाला 4 एप्रिलला त्याच्या प्रॉपर्टी मॅनेजमेंट स्टाफकडून फोन आला. ज्यात त्यांनी सांगितलं तुमच्या घरात आग लागली आहे.
मालक डॅनडन दक्षिण-पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील आपल्या फ्लॅटमध्ये पोहोचला आणि त्याला जाणवलं आग लागण्यासाठी त्याची मांजर जबाबदार होती. जिंगोडियाओ नावाची मांजर किचनमध्ये खेळत होती आणि तिने चुकीने इंडक्शन कुकरच्या टॅच पॅनलवर पाय ठेवला. ज्यामुळे कुकर सुरू झाला. त्यानंतर मोठी आग लागली.
नंतर अग्निशमन दलाच्या जवानांना ब्रिटिश शॉर्टहेयर मांजर वरच्या मजल्यावर एका कॅबिनेटमध्ये लपून बसलेली दिसला. तिच्या बरीच राखही जमा झाली होती. सुदैवाने मांजरीला काही इजा झाली नाही.
मांजरीच्या मालकाने नंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माफी मागितली. तो म्हणाला की, आग लागण्याला तोच जबाबदार आहे. कारण तो कुकरचा स्वीच बंद करणं विसरला होता. त्याने लोकांनाही अशी चूक न करण्याचं आवाहन केलं आहे.