जगातील सर्वात वयस्कर 'पांडा'चा केला वाढदिवस साजरा
By admin | Published: January 18, 2017 07:57 PM2017-01-18T19:57:29+5:302017-01-18T20:50:17+5:30
जगातील सर्वाधिक वयस्कर असलेल्या पांडा या प्राण्याचा 37 वा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
बिजिंग, दि. 18 - जगातील सर्वाधिक वयस्कर असलेल्या पांडा या प्राण्याचा 37 वा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला.
'बासी' असे या पांडा मादीचं नाव असून तिचा जन्म 1980 मध्ये झाला होता. तिला जगातील सर्वात वयस्कर पांडा म्हणून ओळखले जाते. सध्या बासी चीनमधील फुझोऊ शहरातील पांडा रिसर्च सेंटर आहे. या ठिकाणी तिचा 37 वा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.
बासीला फुझोऊ शहरातील पांडा रिसर्च सेंटरमध्ये 1984 साली आणण्यात आले होते. तिची प्रकृती सध्या कणखर असून रिसर्च सेंटरमध्ये ती मनमोकळं फिरते, वेळेवर खाणं खाते आणि झोप सुद्धा योग्य त्यावेळी घेते. तसेच तिचे वजन 100 किलोच्या आसपास असल्याची माहिती पांडा रिसर्च सेंटरचे संचालक चेन युकून यांनी दिली.