तब्बल ११८ वर्षांपासून सतत पेटत आहे 'हा' बल्ब, गिनीज बुकमध्येही आहे नोंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:38 PM2019-09-23T15:38:24+5:302019-09-23T15:46:51+5:30
सामान्यपणे कोणताही बल्ब विकत घेताना कंपन्या साधारण १ किंवा फार फार तर २ वर्षांची गॅरंटी देतात. पण असं फारच कमी वेळा होतं की, बल्ब लागोपाठ दोन किंवा तीन वर्ष चालला असेल.
(Image Credit : Social Media)
सामान्यपणे कोणताही बल्ब विकत घेताना कंपन्या साधारण १ किंवा फार फार तर २ वर्षांची गॅरंटी देतात. पण असं फारच कमी वेळा होतं की, बल्ब लागोपाठ दोन किंवा तीन वर्ष चालला असेल. अशात तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की, जगात एक असाही बल्ब आहे, जे गेल्या ११८ पासून सतत पेटत आहे. आजपर्यंत हा बल्ब फ्यूज झालाच नाही.
या अजब बल्बला सेंटेनिअल या नावाने ओळखलं जातं. कॅलिफोर्नियाच्या लिव्हरमोर शहरातील अग्नीशमन दलाच्या केंद्रात असलेला हा बल्ब शेल्बी इलेक्ट्रॉनिक कंपनीने तयार केला होता. हा बल्ब पहिल्यांदा १९०१ मध्ये पेटवण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा बल्ब सतत पेटताच आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९३७ मध्ये विजेचा तार बदलण्यासाठी हा बल्ब पहिल्यांदा बंद करण्यात आला होता आणि तार दुरूस्त केल्यावर हा बल्ब पुन्हा पेटवण्यात आला. या बल्बची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या बल्बवर सीसीटीव्ही कॅमेराने नजर ठेवली जाते.
चार व्हॉल्ट विजेवर चालणारा हा बल्ब २५ तास पेटताच ठेवला जातो. २००१ मध्ये या बल्बचा १००वा वाढदिवस मोठ्या धडाक्यात साजरा केला गेला होता. आता तर हा अनोखा बल्ब बघण्यासाठी दूरदुरून लोक येतात. या अग्नीशमन केंद्रात इतकी गर्दी होते की, जणू इथे म्यूझिअम आहे.
२०१३ मध्ये हा बल्ब आपोआप बंद झाला होता. तेव्हा लोकांना वाटलं होतं की, बल्ब फ्यूज झाला असेल, पण जेव्हा चेक केलं तर तार खराब झाली होती. तार पुन्हा दुरूस्त करण्यात आली आणि बल्ब पुन्हा पेटला.