या ‘Center of the Universe’ वर असं काही घडतं जे वाचून तुम्ही चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:11 PM2019-12-17T13:11:24+5:302019-12-17T13:26:00+5:30

असे म्हणतात ना की, हे जग नियमाने चालतं. पण जगात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे भौतिकशास्त्राचे सगळे नियम फेल होतात.

The Center of The Universe in Tulsa | या ‘Center of the Universe’ वर असं काही घडतं जे वाचून तुम्ही चक्रावून जाल!

या ‘Center of the Universe’ वर असं काही घडतं जे वाचून तुम्ही चक्रावून जाल!

Next

अमेरिकेतील एका ठिकाणाला ‘Center of the Universe’ म्हटलं जातं. कारण या ठिकाणी जे होतं तसं जगात कुठेच होत नाही. असे म्हणतात ना की, हे जग नियमाने चालतं. पण जगात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे भौतिकशास्त्राचे सगळे नियम फेल होतात. पृथ्वीवर असंच एक ठिकाण आहे ज्याला ‘Center of the universe’ म्हटलं जातं. 

(Image Credit : atlasobscura.com)

अमेरिकेतील Oklahoma प्रांतात Tulsa नावाचं एक शहर आहे. इथे बघण्यासाठी तर काही खास नाही. पण इथे असं काही घडतं की, त्याने तुमचं डोकं चक्रावून जाईल. इथे केवळ एक ३० इंचाचं सर्कल आहे. यालाच ‘Center of the universe’ म्हणतात. त्याच्या आजूबाजूला वीटांचा एक घेर आहे. एकूण हा व्यास ८ फूटाचा आहे.

काय आहे याची खासियत?

(Image Credit : tulsaworld.com)

जेव्हा तुम्ही या सर्कलमध्ये उभे राहून काही बोलता किंवा आवाज करता तेव्हा तुमचा आवाज रिव्हर्समध्ये तुम्हालाच ऐकायला मिळेल म्हणजे Echo होईल. जेवढा मोठा आवाज तुम्ही कराल तेवढ्या वेगाने तुम्हाला तो ऐकू येईल. इथे Echo सिस्टीमसाठी काहीही केलेलं नाही हे तुम्हाला फोटोत स्पष्ट दिसू शकतं.

(Image Credit : atlasobscura.com)

याहूनही आश्चर्याची एक बाब म्हणजे या सर्कलच्या बाहेर काही पावलांवर उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला तुमचा आवाज अजिबात ऐकायला येणार नाही. जर तुम्ही फार जास्त जोरात आवाज केला तर त्या व्यक्तीला तुमचा आवाज तोडका-मोडका ऐकायला जाईल तोही ध्वनि स्वरूपात.

(Image Credit : consciousreminder.com)

या ठिकाणाचा आश्चर्य इथेच थांबत नाही तर सर्कलच्या बाहेर उभा व्यक्ती काही बोलला तर सर्कलच्या आत उभ्या व्यक्तीला त्याचा आवाज ऐकायला येत नाही. म्हणजे जर तुम्ही सर्कलमध्ये उभे आहात आणि दुसरी व्यक्ती सर्कलच्या बाहेर तर तुम्ही काही पावलांवरच असून सुद्धा एकमेकांशी बोलू शकत नाही.

(Image Credit : omgfacts.com)

या ठिकाणाच्या या आश्चर्यकारक गोष्टीबाबत अनेक रिसर्च करण्यात आले. पण त्या रिसर्चमधून ठोस असं काहीच हाती लागलं नाही. काही लोक याला ब्रम्हांडाचं केंद्रबिंदू मानतात तर काही लोक आणखी काही. या जागेवरील विचित्र गुणामुळे इथे हे सर्कल १९८० मध्ये तयार करण्यात आलं होतं. या सर्कलमध्ये ध्वनिचा प्रभाव इतका अद्भुत आहे की, यात तुम्ही टाचनी जरी पाडली तरी आवाज तुम्हाला एखादी मोठी वस्तू पाडल्यासारखा येईल.


Web Title: The Center of The Universe in Tulsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.