काय सांगता? तब्बल 33 वर्षे फक्त चहा पिऊन जगतेय "ही" महिला, 'चायवाली चाची'ला पाहून डॉक्टरही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 08:22 PM2021-01-07T20:22:29+5:302021-01-07T20:32:53+5:30
Chai Wali Chachi : गेल्या काही वर्षांपासून चहा पिऊनही पल्ली देवी यांच्या आरोग्यावर कोणताच परिणाम झालेला नाही.
नवी दिल्ली - सकाळच्या वाफळलेल्या चहाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. आपापल्या परीने प्रत्येक जण कडक चहासोबत कामाची सुरुवात करत असतो. काहींचं तर कामाच्या ठिकाणी दिवसातून बऱ्याचदा चहा पिणं होतं. मात्र एखादी व्यक्ती 33 वर्षे चहा पिऊन जगतेय असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला कोणीचं विश्वास ठेवणार नाही पण हो हे खरं आहे. छत्तीसगडमधील एक महिला गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ फक्त चहावरच जगते आहे. पल्ली देवी असं महिलेचं नाव असून त्या कोरिया जिल्ह्यातील बदरिया गावच्या रहिवासी आहेत. फक्त चहावर जगत असल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत.
पल्ली देवी गेल्या 33 वर्षांपासून फक्त आणि फक्त चहा पिऊनच जिवंत आहेत. इतकी वर्षे त्यांनी अन्नाचा कणही घेतला नाही. चायवाली चाची म्हणून त्या लोकप्रिय होत्या. 1985 मध्ये त्यांचं लग्न झालं पण लग्नानंतर त्या पहिल्यांदा माहेरी आल्या त्या परत सासरी गेल्याच नाही. पल्ली देवी यांचे वडील रतिराम यांनी त्यांच्या चहाच्या सवयीबाबत सांगितलं आहे. पल्ली देवी सहावीत होत्या तेव्हाच त्यांनी जेवण सोडलं. तर भावानं आपल्याला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून आपण बहिणीला असंच पाहत आल्याचं सांगितलं.
घरमध्ये ज्या ठिकाणाहून दूध आणलं जायचं त्या दूध विक्रेत्याला पैसे द्यायला उशीर झाल्यानंतर त्यांनी खूप सुनावलं होतं. तेव्हापासून आपली बहीण काळा चहा पिऊ लागली अशी माहिती भावाने दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून चहा पिऊनही पल्ली देवी यांच्या आरोग्यावर कोणताच परिणाम झालेला नाही. ती पूर्णपणे ठणठणीत आहे, यामुळे डॉक्टरही हैराण झालेत. चहा पिण्याची असल्याने त्यांना कोणता आजार आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. मात्र डॉक्टरांना अशा कोणत्याही आजाराची माहिती झाली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कौतुकास्पद! तरुणाने आपल्या जिद्दीवर संकटाचं रुपांतर केलं संधीत, ऑर्गेनिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपुढे नवा आदर्शhttps://t.co/YnmSVrKoxJ#coronalockdown#OrganicFarming
— Lokmat (@MiLOKMAT) January 5, 2021
मस्तच! सोप्या पद्धतीने बुक करता येणार सिलिंडर, जाणून घ्या कसं?https://t.co/hkmsjALVMv#LPG#Cylinder
— Lokmat (@MiLOKMAT) January 2, 2021