याला म्हणतात नशीब! 4 हजारांत खरेदी केलेली खुर्ची निघाली ऐतिहासिक; झाली 70 लाखांना विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 04:16 PM2023-06-12T16:16:53+5:302023-06-12T16:17:50+5:30

एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. तरुणाने 4 हजार रुपयांना जुनी खुर्ची खरेदी केली. नंतर त्याला कळलं की ही एक ऐतिहासिक खुर्ची आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे.

chair which was bought by person for 4 thousand was historical sold in auction for 70 lakhs | याला म्हणतात नशीब! 4 हजारांत खरेदी केलेली खुर्ची निघाली ऐतिहासिक; झाली 70 लाखांना विक्री

याला म्हणतात नशीब! 4 हजारांत खरेदी केलेली खुर्ची निघाली ऐतिहासिक; झाली 70 लाखांना विक्री

googlenewsNext

नशीब कधी साथ देईल, काही सांगता येत नाही. येणार्‍या काळात अनेक वेळा अशी एखादी गोष्ट मिळते, जी आपण किरकोळ समजतो, पण नंतर कळतं की ती खूप खास आहे. एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. तरुणाने 4 हजार रुपयांना जुनी खुर्ची खरेदी केली. नंतर त्याला कळलं की ही एक ऐतिहासिक खुर्ची आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे. त्याने या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे.

इंडियाटाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या जस्टिन मिलरनेही बाजारातून स्वत:साठी एक खुर्ची खरेदी केली होती. खरं तर, त्याने फेसबुक मार्केटिंग कम्युनिटीवर ऑनलाईन खुर्ची पाहिली होती. ही खुर्ची लेदरची होती, जी जस्टिनला आवडली. क्षणाचाही विलंब न लावता त्याने खुर्ची मागवली.

खुर्चीची ऑर्डर दिल्यानंतर जस्टिनने सांगितले की ती खूप खराब खुर्ची होती. पण वेगळ्या डिझाईनमुळे जस्टिनला वाटलं की ते एंटीक आहे. अशा परिस्थितीत त्याने खुर्चीची खरी किंमत जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध ऑक्शन हाउस Sotheby's शी संपर्क साधला. ऑक्शन हाउसने पुष्टी केली आहे की ही खरोखर एक ऐतिहासिक खुर्ची आहे. ही खुर्ची डॅनिश फर्निचर डिझायनरने तयार केलेल्या 50 डिझाइनपैकी एक आहे. लेदर पाहिल्यानंतर त्याची मूळ किंमत 22 लाख रुपये ठेवण्यात आली होती. अखेरीस ती 70 लाखांवर थांबली.

जस्टिनला मात्र ही खुर्ची केवळ 50 लाख रुपयांना विकली जाईल, अशी आशा होती. मात्र ती 70 लाख रुपयांना विकली गेली. जस्टिनला हा करार खूप चांगला वाटत आहे. जस्टिन म्हणाला - मी भाग्यवान आहे की मला ही खुर्ची मिळाली. या डीलमध्ये मला लाखोंचा फायदा झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: chair which was bought by person for 4 thousand was historical sold in auction for 70 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.