आयुष्यात पुन्हा कधीच जेवण नाही करू शकणार ही महिला शेफ, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 01:34 PM2021-04-20T13:34:54+5:302021-04-20T13:36:31+5:30

हार्मेसाबाबत अनेक वर्षांच्या चुकीच्या निदानानंतर करण्यात आलेल्या परीक्षणांनंतर समोर आलं की, या आजाराने त्यांच्या पोटाला पॅरालाइज्ड केलं आहे.

Chef Loretta Harmes can never eat food again here is the reason | आयुष्यात पुन्हा कधीच जेवण नाही करू शकणार ही महिला शेफ, जाणून घ्या कारण!

आयुष्यात पुन्हा कधीच जेवण नाही करू शकणार ही महिला शेफ, जाणून घ्या कारण!

Next

भाजलेला बटाटा हा शेवटचा पदार्थ होता जो लोरेटा हार्मेसने अखेरचा खाल्ला होता. ही सहा वर्षाआधीची बाब आहे. ही शेफ महिला पुन्हा कधीच कोणताही ठोस आहार खाऊ शकणार नाही. ब्रिटनची लोरेटा हार्मेस, एहलर्स-डानलोस सिंड्रोम या दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहे. हा एक आनुवांशिक आजार आहे. हार्मेसबाबत अनेक वर्षांच्या चुकीच्या निदानानंतर करण्यात आलेल्या परीक्षणांनंतर समोर आलं की, या आजाराने तिच्या पोटाला पॅरालाइज्ड केलं आहे. असं असलं तरी तिने तिचं जेवण तयार करण्याचं पॅशन सोडलं नाही.

हर्मेस आता कोणत्याही पदार्थाची चव घेऊ शकणार नाही. पण ती तिने बनवलेले पदार्थ इन्स्टाग्रामवर शेअर करणं सुरूच ठेवलं आहे. यावर दिवसेंदिवस तिचे फॉलोअर्स वाढत आहेत. लोरेटाने बीबीसीसोबत बोलताना सांगितले की, 'मला विश्वास बसत नाहीये की, माझी कहाणी जगासमोर सांगितली गेली आणि लोकांकडून मन जिंकणाऱ्या प्रतिक्रिया आल्या.

हर्मेसने बीबीसीसोबत खुलासा केला की, तिला जेवण केल्यावर पोटात वेदना होत होत्या. २०१५ मध्ये ती केवळ तरल पदार्थ खाऊन जिवंत होती. लंडनच्या सेंट मार्क हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या टेस्टमध्ये तिला हायपरमोबाइल एहलर्स-डॅनलोस सिंड्रोमच निदान झालं. हा आजारा १३ विकारांचा समूह आहे. यात आपल्या आतड्यांचं नुकसान होतं.

२३ वर्षीय हार्मेसला तिच्या आजाराची माहिती अनेक वर्षांनी मिळाली. आधी चुकीच्या आजाराचं निदान करण्यात आलं होतं. लॉरेटोने १५ वर्षापूर्वी एनोरेक्सियासोबत लढा दिला होता. तिला आधीपासूनच पचनासंबंधी समस्या होती. तरी ती खाण्यात यशस्वी झाली. ती १९ वर्षांची झाली आणि कॉलेजला जाऊ लागली तेव्हा गोष्टी बदलू लागल्या होत्या.

 

डॉक्टरांनी तिला सांगितलं की, तिचा एनोरेक्सिया आजार पुन्हा परत आलाय. ज्यामुळे तिचं वजन कमी होऊ लागलं होतं. तिचं वजन २५ किलो इतकंच झालं होतं. त्यानंतर तिला वेगळी ट्रीटमेंट दिली जात होती. ज्यानुसार तिला दिवसभरात सहा वेळा जेवण करायचं होतं. एका ठरलेल्या वेळेत ते जेवण संपावायचं होतं. जेवण केल्यावर तिचं पोट दुखत होतं. जेवण संपेपर्यंत तिला टेबलवरून उठण्यास मनाई होती.

ती सांगते की, 'मी पूर्णपणे एनोरेक्सियातून मुक्त झाले. पण हा आजार जीवनभराची शिक्षा बनला'. भाजलेला बटाटा हा माझं काही वर्षापूर्वीचं शेवटचं जेवण होतं. आता तिला केवळ तरल पदार्थ खावे लागतात. हे तरल पदार्थ माझ्या पचन तंत्रात मिसळतात'.हर्मेस कधीही ठोस आहार घेऊ शकत नाही किंवा पाणीही पिऊ शकत नाही. 
 

Web Title: Chef Loretta Harmes can never eat food again here is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.