दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन; 1 प्लेट जेवणासाठी मोजावे लागणार 1 तोळा सोनं, काय आहे खास..?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 06:02 PM2023-04-23T18:02:31+5:302023-04-23T18:12:11+5:30

इटलीतील प्रसिद्ध रेस्टॉरंट दुसऱ्यांदा भारतात अशाप्रकारचे आयोजन करत आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Chef Massimo Bottura brings his food to Delhi, 1 plate of food costs 1 tola of gold | दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन; 1 प्लेट जेवणासाठी मोजावे लागणार 1 तोळा सोनं, काय आहे खास..?

दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन; 1 प्लेट जेवणासाठी मोजावे लागणार 1 तोळा सोनं, काय आहे खास..?

googlenewsNext


नवी दिल्ली: चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खाणे-पिणे सर्वांनाच आवडते. मध्यमवर्गीय असो वा श्रीमंत, प्रत्येक वर्गातील लोकांसाठी राजधानी दिल्लीत रेस्टॉरंट्स आहेत. दरम्यान, दिल्लीतील एका प्रसिद्ध विदेशी रेस्टॉरंटने खाद्यप्रेमींसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, परंतु खाद्यपदार्थांची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. 

प्रसिद्ध इटालियन शेफ मॅसिमो बोटुरा यांच्या थ्री मिशेलिन स्टार रेस्टॉरंटला जगातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट म्हणून मानांकन देण्यात आले आहे. या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, येथे खाण्यासाठी खूप पूर्वीच अॅडव्हान्स बुकिंग करावे लागते. काहीवेळा बुकिंग कालावधी सुमारे 6 महिन्यांपेक्षा जास्त असू शकतो. या रेस्टॉरंटमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

प्रसिद्ध इटालियन रेस्टॉरंट बोटुरा भारतात दुसर्‍यांदा असा खास कार्यक्रम आयोजित करत आहे. यामध्ये खास खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी येणाऱ्या लोकांना 55 हजार 555 रुपये मोजावे लागणार आहेत. या रकमेवर स्वतंत्रपणे टॅक्स आकारला जाईल. इतक्या पैशात एक तोळा सोनं येईल. विशेष म्हणजे, दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी इटलीतून काही कच्चा माल आणि मसालेही आयात केले जात आहेत. 

बोटुरा रेस्टॉरंट दिल्लीतील हॉटेल लीला येथे हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. यात फक्त 600 पाहुण्यांना उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. या खास प्रसंगी ड्रॉप्ड द लेमन टार्ट, द क्रन्ची पार्ट ऑफ द लॅसग्ने आणि सायकेडेलिक कॉड नॉट फ्लेम ग्रील्ड हे विशेष पदार्थ म्हणून दिले जातील. इटलीच्या या प्रसिद्ध रेस्टॉरंटने अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना होस्ट केले आहे. त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचाही समावेश आहे. आश्चर्य म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये जेवण घेण्यासाठी त्यांनाही बुकिंग करावी लागली.

Web Title: Chef Massimo Bottura brings his food to Delhi, 1 plate of food costs 1 tola of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.