55 वर्षीय अमेरिकन महिला पडली 25 वर्षीय भारतीयाच्या प्रेमात; लग्नासाठी आली साता समुद्रपार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 12:01 PM2023-02-24T12:01:44+5:302023-02-24T12:07:09+5:30
अमेरिकन महिला आणि तरुणाची पहिली भेट सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी झाली होती.
प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. मध्य प्रदेशातील छतरपूरच्या खजुराहो येथील तरुणाची प्रेमकहाणीही अशीच आहे. त्याच्या प्रेमात असलेली 55 वर्षीय अमेरिकन महिला लग्नासाठी अर्ज करायला खजुराहो येथे आली आहे. सांचेज वार्गेस मार्थाजूलिया असं या महिलेचं नाव असून ती मूळची कॅलिफोर्नियाची आहे. सांचेज ही योगा टिचर आहे. तसेच अमन तनय शेख आझाद असे या तरुणाचे नाव असून तो खजुराहो येथील रहिवासी आहे. लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.
अमेरिकन महिला आणि तरुणाची पहिली भेट सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी झाली होती. तरुणाने सांगितले की, ती खजुराहोला भेट देण्यासाठी आली होती. याच दरम्यान ती दुकानात खरेदी करण्यासाठी आली होती, तो तरुण तिथे काम करत असे आणि पहिली भेट तिथेच झाली. त्यानंतर ती जेव्हाही अमेरिकेतून यायची तेव्हा ती अमन तनय शेख आझादला भेटायची आणि त्याच्या घरीही जायची. हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
ADM ने दिली माहिती
एडीएमने सांगितले की, एक असा अर्ज आला होता, ज्यामध्ये एका विदेशी महिलेला खजुराहो येथील मुलाशी लग्न करायचे आहे. अर्ज आल्यानंतर तो स्वीकारून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला. तसेच कुटुंबही यासाठी तयार असल्याचे सांगितले.
खजुराहोतील मुलांचे याआधीही परदेशी मुलींसोबत लग्न झाल्याची प्रकरणे समोर येत आहेतखजुराहो हे एक जागतिक पर्यटन स्थळ आहे, बहुतेक परदेशातून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे याआधीही अशी प्रकरणे येथे पाहायला मिळाली आहेत. असे सांगितले जात आहे की छतरपूरच्या खजुराहोमध्ये आतापर्यंत 50 हून अधिक लोकांनी अशा प्रकारे लग्न केले आहे आणि ते चांगले आयुष्य जगत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"