घराची सफाई करताना सापडलं 60 वर्ष जुनं बॅंक पासबुक, कोट्याधीश बनला व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 03:21 PM2023-08-07T15:21:11+5:302023-08-07T17:36:44+5:30
Old Bank Passbook: पासबुक पाहिल्यावर त्याला जे दिसलं ते पाहून तो लगेच सरकारकडे गेला आणि पैशांची मागणी केली. पण सरकारने त्याचं काही ऐकलं नाही. त्यानंतर ही व्यक्ती कोर्टात गेली.
Old Bank Passbook: जेव्हाही कुणी त्यांच्या घराची सफाई करतात तेव्हा लोकांना यावेळी वेगवेगळ्या जुन्या गोष्टी साडतात. अशात जर तुम्हाला सफाई करताना असं काही मिळालं ज्याने तुम्ही कोट्याधीश व्हाल तर काय? असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. या व्यक्तीला घरातील जुन्या सामानात एक जुनं बॅंक पासबुक सापडलं. पासबुक पाहिल्यावर त्याला जे दिसलं ते पाहून तो लगेच सरकारकडे गेला आणि पैशांची मागणी केली. पण सरकारने त्याचं काही ऐकलं नाही. त्यानंतर ही व्यक्ती कोर्टात गेली.
सापडलं वडिलांचं जुनं पासबुक
चिली इथे राहणारा एक्सेकिल हिनोजोसा (Exequiel Hinojosa) घराची साफ-सफाई करत होता. यावेळी त्याला वडिलाचं एक 60 वर्ष जुनं पासबुक सापडलं. या बॅंक अकाऊंटबाबत कुणाला काहीच माहिती नव्हती.
या व्यक्तीच्या वडिलांचं साधारण 10 वर्षाआधीच निधन झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीच्या वडिलानी आपल्या बॅंक अकाऊंटमध्ये 1960-70 दरम्यान घर खरेदी करण्यासाठी पैसे जमा केले होते. अकाऊंटमध्ये चिली करन्सीचे 1.40 लाख रूपये डिजॉझिट केले होते. सध्या त्यांची व्हॅल्यू 13480 रूपये आहे. पण मुळात त्यावेळची आणि आताची तुलना करावी तर याची व्हॅल्यू खूप जास्त आहे.
ज्याबॅंकेत एक्सेकिलच्या वडिलांनी पैसे जमा केले होते, ती बॅंक आता बंद झाली आहे. बॅंकेतून पैसे मिळणं अवघड होतं. पण बॅंकेच्या पासबुकवर स्टेट गॅरंटीड असं लिहिलं होतं. यानंतर व्यक्तीला विश्वास वाटला की, सरकार त्याला पैसे देईल.
जसा तो सरकारकडे गेले त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा तो कायदेशीर कारवाई करण्यासाठी कोर्टात गेला. केसमध्ये व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या वडिलांनी त्यांच्या मेहनतीचे पैसे बॅंकेत ठेवले होते आणि तो त्याचा अधिकार आहे. यानंतर कोर्टाने महागाई भत्ता आणि व्याज धरून 1 बिलियन इतकी रक्कम व्यक्तीला परत करण्याचा आदेश सरकारला दिला. ज्यामुळे तो कोट्याधीश बनला.