पोटात दुखत होतं म्हणून मुलीला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, X-RAY पाहून डॉक्टर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 11:30 AM2022-12-10T11:30:02+5:302022-12-10T11:31:03+5:30
Magnetic Beads In Stomach: ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, चार वर्षीय मुलीने नकळत हे चुंबकीय बीड्स गिळले.
61 Toy Magnetic Beads In Stomach: अनेकदा डॉक्टरांसमोर पोटदुखीची अशी कारणे समोर येतात की, तेही हैराण होतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका चार वर्षीय मुलीला पोटदुखीची समस्या होती. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जेव्हा एक्स-रे बघण्यात आला तेव्हा असं काही समोर आलं की, बघताच मुलीचे आई-वडील बेशुद्ध झाले.
ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, चार वर्षीय मुलीने नकळत हे चुंबकीय बीड्स गिळले. हे सगळे छोट्या माळेतील मण्यांच्या आकाराचे होते आणि मुलीने हे एक एक करून आपल्या तोंडात टाकले होते. हे पालकांनी अजिबात माहीत नव्हतं.
काही दिवसांनंतर मुलीच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्या होत्या. यानंतर साधारण एक महिन्याच्या अंतराने जेव्हा मुलीला डॉक्टरांकडे नेण्यात आलं तेव्हा त्यांनी एक्स-रे काढला आणि तो पाहून पालक हैराण झाले. डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीच्या पोटात छोट्या छोट्या काचेच्या गोट्या आहेत. रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी सांगितलं की, यांची संख्या फार जास्त आहे.
आतड्यांमध्ये एक डझनपेक्षा जास्त छिद्र
यानंतर मुलीचं ऑपरेशन करण्यात आलं. हालत अशी झाली होती की, मुलीच्या आतड्यांमध्ये एक डझनपेक्षा जास्त छिद्र झाले होते. जर ऑपरेशन करण्यात जास्त उशीर झाला असता तर मुलीचा जीवही जाऊ शकला असता. डॉक्टरांनी या मुलीच्या पोटातून 61 मॅग्नेटि बीड्स काढले. हे ऑपरेशन 3 तास चाललं. आता तिची तब्येत बरी आहे.