चोरी करायला गेला अन् तिथेच झोपला चोर, घोरण्याचा आवाज ऐकून आला मालक आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 10:28 AM2023-11-21T10:28:35+5:302023-11-21T10:29:25+5:30
काही लोक ज्या घरात चोरी करायला जातात ते घर आपलं समजूनच वागतात. तिथे ते खाणं-पिणं करतात आणि निवांत झोपतात.
चोरी आणि दरोड्यांच्या अनेक केसेस रोज कुठेना कुठे घडत असतात. चोर घरांमध्ये घुसतात आणि त्यांच्या हाती जे लागतं ते घेऊन पसार होतात. ते चोरी करताना कुठेही जास्त वेळ थांबण्याच्या फंद्यात पडत नाही. कारण त्यांना पकडले जाण्याची भीती असते. पण काही चोर फारच वेगळे असतात. काही लोक ज्या घरात चोरी करायला जातात ते घर आपलं समजूनच वागतात. तिथे ते खाणं-पिणं करतात आणि निवांत झोपतात.
चीनमधील एका चोराने असाच कारनामा केला. तो एका घरात चोरी करण्यासाठी गेला होता. चोर सामान्यपणे घरातील लोक झोपल्यानंतर गपचूप घरात शिरतात आणि चोरी करून पळून जातात. पण हा चोर फारच आळशी निघाला. तो आपलं काम करण्याआधीच झोपला आणि त्यानंतर जे झालं ते मजेदार आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनचा एक चोरी युनान प्रांतातील एक घरात शिरला होता. ही घटना 8 नोव्हेंबरची आहे. चोर जेव्हा घरात शिरला तेव्हा त्याला घरातील लोकांच्या बोलण्याचा आवाज आला. अशात त्याने विचार केला की, ते झोपल्यावर आपण आपलं काम करू. मग तो एका जागी लपून बसला. पण घराचे मालक झोपण्याआधीच तो झोपला. घरातील लोकांना घोरण्याचा आवाज आला. पण हा आवाज कुठून येतोय हे त्यांना समजत नव्हतं. आधी तर घरातील लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण 40 मिनिटांनी ती मुलांची दुधाची बॉटल धुण्यासाठी आली तेव्हा तिला घोरण्याचा आवाज आणखी जोरात आला.
रूममध्ये झोपला होता चोर
महिलेने जेव्हा एका दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा एक अनोळखी व्यक्ती झोपलेली दिसली. महिलेने धावत जाऊन घरातील इतरांना जागं केलं आणि पोलिसांना फोन केला. चोर इतका गाढ झोपला होता की, त्याला पोलीस आल्याचंही समजलं नाही. नंतर समजलं की, हा चोर सराईत गुन्हेगार आहे आणि तुरूंगातही राहिला आहे. सध्या या घटनेची सोशल मीडिया चर्चा होत आहे.