पत्नीसोबत दगाबाजी केली तर नोकरीहून काढेल ही कंपनी, अनैतिक संबंधावर आहे बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:05 PM2023-06-19T17:05:07+5:302023-06-19T17:05:26+5:30

Weird Rule : कंपनीत हा अजब नियम सगळ्यांवर लागू करण्यात येईल. कंपनीकडून सांगण्यात आलं की, हा नियम कंपनीचं काम मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

China : Company threatens to fire married staff for cheating people baffled over it | पत्नीसोबत दगाबाजी केली तर नोकरीहून काढेल ही कंपनी, अनैतिक संबंधावर आहे बंदी!

पत्नीसोबत दगाबाजी केली तर नोकरीहून काढेल ही कंपनी, अनैतिक संबंधावर आहे बंदी!

googlenewsNext

Company Fires Staff for Extramarital Affair: कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही सुविदा दिल्या जातात तर काही सूचनाही दिल्या जातात. जर कंपनीच्या नियम-कायद्यांचं उल्लंघन केलं गेलं तर त्यांना शिक्षाही दिली जाते. हे नियम कंपनी स्वत: तयार करते आणि कर्मचाऱ्यांना ते फॉलो करावे लागतात. सध्या एका कंपनीचा एक अजब नियम चर्चेत आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही कंपनी चीनच्या ज़ेजियांग प्रांतात आहे. 9 जून रोजी या कंपनीकडून एक आदेश जारी करण्यात आला की, इथे काम करणाऱ्या व्यक्तीचं लग्नाशिवाय जर कोणतं आढळून आलं, तर त्यांना नोकरीहून काढलं जाईल. ही इथे नोकरी करण्याची अट आहे.

कंपनीत हा अजब नियम सगळ्यांवर लागू करण्यात येईल. कंपनीकडून सांगण्यात आलं की, हा नियम कंपनीचं काम मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कॉर्पोरेट कल्चरमध्ये कर्मचारी कुटुंबासोबत प्रमाणिक असावा, पती-पत्नीमध्ये प्रेम असावं आणि परिवाराला सुरक्षित ठेवत कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. जे कर्मचारी विवाहित आहेत त्यांच्या अनैतिक संबंधांवर कंपनीने बंदी घातली आहे. जर कुणी नियम तोडला तर त्यांना नोकरी गमवावी लागेल. कर्मचाऱ्यांना चार गोष्टींची मनाई आहे ज्यात अनैतिक संबंध, घटस्फोट. 

कंपनीने सांगितलं की, एक चांगला आणि प्रमामिक कर्मचारीच आपलं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. अशात V&T Law Firm चे वकिल शेन डॉन्ग यांच्यानुसार, कंपनी केवळ या कारणाने कुणाला काढू शकत नाही की, त्या व्यक्तीचं अफेअर आहे. सोशल मीडियावरही या नियमाबाबत वेगवेगळ्या रिअॅक्शन येत आहेत. 

Web Title: China : Company threatens to fire married staff for cheating people baffled over it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.