तणाव दूर करण्यासाठी 'इथे' ऑफिसमध्ये ठेवतात केळी, काय आहे टेंशन पळवण्याचा हा फंडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 02:54 PM2024-06-05T14:54:39+5:302024-06-05T15:03:30+5:30

चीनमध्ये तणाव दूर करण्यासाठी ऑफिसमधील लोक एक वेगळाच उपाय करत आहे. जो तुम्हाला अनोखा वाटेल.

China company's using desktop bananas to battle workplace stress | तणाव दूर करण्यासाठी 'इथे' ऑफिसमध्ये ठेवतात केळी, काय आहे टेंशन पळवण्याचा हा फंडा?

तणाव दूर करण्यासाठी 'इथे' ऑफिसमध्ये ठेवतात केळी, काय आहे टेंशन पळवण्याचा हा फंडा?

धावपळीचं जीवन, वाढतं काम, नोकरी टिकण्याची स्पर्धा यामुळे बरेच लोक ऑफिसमध्ये तणावात असतात. इतकंच काय तर काही लोकांना सततच्या तणावामुळे तणाव घेण्याची सवयच लागलेली असते. लोक आपला तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळे उपायही करत असतात. काहींना याचा फायदा होतो तर काहींना नाही. पण चीनमध्ये तणाव दूर करण्यासाठी ऑफिसमधील लोक एक वेगळाच उपाय करत आहे. जो तुम्हाला अनोखा वाटेल.

केळी खाणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पण केळींचा वापर एका वेगळ्याच पद्धतीने चीनमधील एक कंपनी करत आहे. केळींचा असा वापर याआधी तुम्ही कधी पाहिला नसेल. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, कर्मचाऱ्यांचा तणाव कमी करण्यासाठी केळींचा वापर केला जात आहे.

केळींममुळे तणाव कमी कसा होतो?

चीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. यात चीनच्या काही कंपन्यांच्या ऑफिसमध्ये टेबलवर ठेवलेली केळीच्या फणी दाखवली आहे. केळींचा हा गुच्छा एका भांड्यात ठेवला जातो आणि हिरवी केळी पिकण्याची वाट बघितली जाते. जेव्हा ही केळी पिकतात तेव्हा ती कर्मचारी खातात. ही प्रक्रिया होण्यासाठी साधारण एक आठवड्याचा वेळ लागतो.

केळींमुळे दूर होतो तणाव

या केळींना तणाव दूर करणाऱ्या केळी म्हटलं जात आहे. असं मानलं जातं की, अशाप्रकारे केळी पिकताना बघितल्याने ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांचा तणाव कमी होतो. डेस्कटॉप बनानाच्या माध्यमातून तणाव दूर होतो, एक आशा तयार होते आणि आपसात वाटून खाल्ल्याने ऑफिसमध्ये एक मैत्रीचं वातावरण राहतं. लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, "ही केळी विकण्याची स्ट्रॅटेजी आहे". दुसऱ्याने लिहिलं की, "त्यांच्या ऑफिसमध्ये केळींसोबत अननसही उगवले जात आहेत".

Web Title: China company's using desktop bananas to battle workplace stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.