हाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 06:41 PM2020-09-10T18:41:41+5:302020-09-10T18:50:39+5:30
नाकावरील पुळी हाताने फोडल्यानंतर तिच्या मेंदूत गंभीर असं इन्फेक्शन झालं आहे. ज्यामुळे तिला जीव सुद्धा गमवावा लागू शकतो.
तोंडावर कुठेही पुळ्या आल्या की अनेकांना पुळ्या फोडायची सवय असते. हार्मोनल बदल, तेलकट त्वचा इतर अनेक कारणांमुळे त्वचेवर पिंपल्स येत असतात. कधीकधी नाकावर पुळी आल्यास संपूर्ण लूक बिघडतो. तुम्हाला सुद्धा अशी सवय असेल तर ही घटना वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नाकावरची पुळी हाताने फोडण्याच्या नादात एका तरूणीवर गंभीर परिस्थिती ओढावली आहे. नाकावरील पुळी हाताने फोडल्यानंतर तिच्या मेंदूत गंभीर असं इन्फेक्शन झालं आहे. ज्यामुळे तिला जीव सुद्धा गमवावा लागू शकतो.
चीनच्या झेजियांग भागातील निंघई शहरात वास्तव्यास तरूणीचे नाव यांग आहे. 19 वर्षांची ही तरुणी. तरुण वयात येतात तशा पुळ्या या तरूणीच्या तोंडावरही येऊ लागल्या. तिच्या नाकावर फक्त एक पुळी आला होती. चेहऱ्यावरील पुळी जाण्यासाठी अनेक मुली फोडून चेहरा क्लिन करण्याचा प्रयत्न करतात. यांगनेही असाच प्रयत्न केला. तिने हातानेच नाकावरील पुळी फोडलं मात्र तिने विचारही केली नसेल असं तिच्यासह घडलं.
डेलीमेलनं दिलेल्या माहितीनुसार या तरुणीच्या नाकावर फक्त एकच पुळी होती. वैतागून तिनं हाताने दाबून फोडली. फोडताच क्षणी तिच्या डोळ्यांखाली वेदना होऊ लागल्या, डोळ्यांना सूज आली, तोंडाच्या एका बाजूची त्वचा लाल झाली. त्यानंतर यांगला तापही आला. मग लगेचच तिला झेजियांग पब्लिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे तिची तपासणी केली असता. तिला मेंदूचं गंभीर असं इन्फेक्शन झाल्याचं समजलं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नाकावर टोकाला ज्या पुळ्या येतात त्यांना ज्याला ट्रायंगल ऑफ डेथ असंही म्हणतात. तिथून दोन्ही बाजूच्या गालाच्या सुरुवातीच्या भागापर्यंत महत्त्वपूर्ण पेशी असतात. या भागाला नुकसान पोहोचल्यास संक्रमण मेंदूपर्यंत पोहोचतं. याला cavernous sinus thrombosis असं म्हटलं जातं. यास्थितीत मेंदूमध्ये रक्त गोठून गुठळ्या तयार होतात. नंतर हे संक्रमण नाक, कान आणि दातांपर्यंत पसरत जातं. अशा स्थितीत रुग्णाचं वाचणं कठीण असतं. 3 पैकी एका रुग्णाला मृत्यूचा सामना करावा लागतो.
यांगची स्थिती आता नाजूक आहे. रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे डॉक्टर हान कुन यांनी सांगितलं, या मुलीमध्ये मेनिंजाइटिसची लक्षणं दिसून येत आहेत. आणखी लक्षणं गंभीर झाल्यास यांगचा जीव वाचवणं कठीण होऊ शकतं.
हे पण वाचा-
बापरे! रस्त्याच्या कडेला पांढरी चादर ओढून झोपलेल्या माणसाला लोक मृतदेह समजले अन् मग....
जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला
काय सांगता? भारतातल्या 'या' मंदिरामध्ये चक्क प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा