श्रीमंत होण्याची अशीही लालसा, स्वत:च्याच जेवणात टाकला मेलेला उंदीर आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:54 PM2019-03-29T12:54:13+5:302019-03-29T12:56:09+5:30

गेल्या काही दिवसात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेवणात कधी झुरळ तर कधी अळ्या आढळल्याच्या घटना ऐकल्या असतील.

China greedy man arrested for dropping dead rat in food news goes viral | श्रीमंत होण्याची अशीही लालसा, स्वत:च्याच जेवणात टाकला मेलेला उंदीर आणि...

श्रीमंत होण्याची अशीही लालसा, स्वत:च्याच जेवणात टाकला मेलेला उंदीर आणि...

Next

गेल्या काही दिवसात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेवणात कधी झुरळ तर कधी अळ्या आढळल्याच्या घटना ऐकल्या असतील. पण आता चीनमधील एका व्यक्तीने अजब-गजब आणि तितकाच किळसवाणा प्रकार केला आहे. तो एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला. जेवण ऑर्डर केलं आणि त्या जेवणात त्याने मेलेला उंदीर टाकला. त्यानंतर रेस्टॉरंटवाल्याला ब्लॅकमेल करू लागला. इतकेच काय कर त्याने रेस्टॉरंटवाल्याकडे ५ कोटी रूपयांची मागणीही केली. 

ही घटना चीनच्या बिजिंग शहरातील आहे.  गुओ नावाची ही व्यक्ती चीनच्या पॉप्युलर फूड चेन कंपनी  हॅदीलाओमध्ये गेला. ही व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत होती. २० मिनिटांनंतर त्याने दावा केला की, त्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर निघाला. 

त्यानंतर रेस्टॉरंटवाल्यांनी त्याला मोफत जेवणाची ऑफर दिली. पण या व्यक्तीने काही एक ऐकलं नाही. त्यानंतर रेस्टॉरंटवाल्यांनी या व्यक्तीला २० हजार युआन म्हणजेच २ लाख रूपये देण्याची ऑफरही दिली. पण ही ऑफर सुद्धा त्याने नाकारली. गुओ म्हणाला की, त्याला ५ मिलियन युआन म्हणजेच ५ कोटी रूपये हवे आहेत.

हे प्रकरण इतकं बिघडलं की, पोलिसांना बोलवावं लागलं. त्यानंतर चौकशी झाली. तेव्हा समोर आलं की, गुओने स्वत: त्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर ठेवला होता. गुओने हा प्लॅन रेस्टॉरंटला ब्लॅकमेल करण्यासाठी केला होता. पण पोलिसांनी त्याची पोलखोल केली. 

गुओने सांगितले की, त्याला घरातून निघताना एक मेलेला उंदीर आढळला. हा उंदीर तो बॉटलमध्ये टाकून रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. सोबतच त्याने हे सांगितले की, त्याने हे जेवण फ्रि मिळावं म्हणून केलं. पण त्याची लालसा वाढली होती. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: China greedy man arrested for dropping dead rat in food news goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.