चीनने तयार केली जगातली पहिली आडवी इमारत, २७ हजार कोटी रूपये आला खर्च!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:44 PM2019-03-04T16:44:48+5:302019-03-04T16:52:20+5:30
चीन हा देश नेहमीच वेगवेगळ्या आश्चर्यजनक गोष्टींसाठी चर्चेत असतो. हा देश नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो.
चीन हा देश नेहमीच वेगवेगळ्या आश्चर्यजनक गोष्टींसाठी चर्चेत असतो. हा देश नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो. आता चीन एका इमारतीमुळे चर्चेत आला आहे. चीनने पुन्हा एकदा इंजिनिअरींगचं शानदार उदाहरण सादर केलं आहे. हे बघून जगभरातील लोक थक्क झाले आहेत. चीनने एक अशी बहुमजली इमारत तयार केली, जी दिसायला लेटलेली वाटते. ही इमारत ४ उभ्या इमारतींवर बांधण्यात आली आहे.
चीनच्या या प्रोजेक्टचं नाव चोंगकिंग आहे. सामान्यपणे इमारती या उभ्या बांधल्या जातात.. पण ही व्हर्टिकल इमारत फारच आश्चर्यजनक आहे. हेच या इमारतीचं वेगळेपण आहे. म्हणजे एकीकडे जगात उंच इमारती उभारण्याची स्पर्धा लागली असताना चीनने आडवी इमारत तयार केली.
ही इमारत २५० मीटर लांब आहे. या इमारतीची खासियत म्हणजे यात १४०० रेसिडेंशिअल अपार्टमेंट आहेत. तसेच यात एक लक्झरी हॉटेल आणि १.६० लाख वर्गमीटरचा मोठा ऑफिस स्पेस सुद्धा आहे. अजून ही इमारत पूर्ण झाली नसून बांधकाम सुरू आहे.
या इमारतीचं डिझाइन चीनच्या पारंपारिक जहाजाप्रमाणे ठेवलं गेलं आहे. या इमारतीवरून यांग्टजी आणि जियालिंग नद्यांचा संगमही बघितला जाऊ शकतो. या इमारतीला क्रिस्टल असं नाव देण्यात आलं आहे.
या आडव्या इमारतीचं निर्माण एशियातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनींपैकी एक असलेल्या कॅपिटालॅंडने केलं आहे. ही इमारत उभारण्यासाठी ६ वर्षांचा कालावधी लागला आणि ही इमारत तयार करण्यासाठी २७ हजार कोटी रूपये खर्च झाले आहेत.